सरचार्ज रक्कम हडप केल्या प्रकरणी पारनेर सैनिक बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- अरुण रोडे

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी

रोख ठोक न्यूज :-
तत्कालीन मा.सहाय्यक निबंधक पारनेर व पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक लि. पारनेर अधिकारी व पदाधिकारी यांनी संगनमताने शासकीय सर चार्ज रक्कम हडप केल्याने त्यांच्यावर कारवाई होऊन शासकीय गुन्हा दाखल अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अरुण रामदास रोडे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश भाऊ वाबळे व कार्याध्यक्ष  विकास झावरे यांनी  निवेदन  द्वारे सहकार आयुक्त तथा निबंधक महाराष्ट्र राज्य यांना मेल द्वारे  केलेली आहे. 
         सविस्तर माहिती अशी की   २००७ पासून ते  ३१-३-२०१९ पर्यंत पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक पारनेर बँकेचे चेअरमन , मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी वर्ग व संचालक मंडळ व सहाय्यक निबंधक पारनेर यांनी अशोक अंबादास दहिवळे या कर्जदाराकडून बेकायदेशीर १५ टक्के जादा सरचार्ज रक्कम वसूल केलेली आहे. सदर रक्कम ही शासन नियमाप्रमाणे ६% वसूल करणे बंधनकारक असताना वरील अधिकारी व पदाधिकारी यांनी संगनमताने ती रक्कम नियमबाह्य १५% कर्जदाराकडून जादा रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. शासन नियमानुसार  वसूल केलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केलेली नाही. अश्या  प्रकारचे  अनेक  कर्जदार  आहेत ज्यांचे या बँकेने ज्यादा सरचार्ज वसूल केलेले आहेत.  त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी माननीय जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था अहमदनगर यांच्यामार्फत लेखापरीक्षण करून या प्रकरणामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी व पदाधिकारी व त्यांना अभिलाषा पोटी पाठीशी घालणारे सहाय्यक निबंधक पारनेर यांच्यावर शासन नियमानुसार चौकशी करून दोषींवर कारवाई करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी. व सर्व संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावेत सदरचे पारनेर सैनिक बँकेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून या कामांमध्ये सराईत गुन्हेगार असून ते सध्या तात्पुरत्या जामिनावर बाहेर फिरत आहेत तरी मी आपणास विनंती करतो की सदर प्रकरणात आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन सदर प्रकरणाची सन २००७ पासून ते आजपर्यंत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून द्यावी.
       अशी  मागणी मा सहकार आयुक्त तथा निबंधक साहेब सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना  अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अरुण रामदास रोडे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश भाऊ वाबळे व कार्याध्यक्ष  विकास झावरे यांनी  निवेदन मेल द्वारे  केलेली आहे.


Post a Comment

0 Comments