राळेगण थेरपाळ मध्ये ३ दिवस जनता कर्फ्यु

राळेगण थेरपाळ मध्ये ३ दिवस जनता कर्फ्यु

रोखठोक न्यूज पारनेर (चंद्रकांत कदम)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत राळेगण थेरपाळ अंतर्गत येणाऱ्या गावठाण व सर्व वाड्या वस्त्यांवर दि. ४ एप्रिल ते ६ एप्रिल तीन दिवस जनता कर्फ्यु ठेवण्यात आला असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन राळेगण थेरपाळ चे नवनिर्वाचित सरपंच पंकज करखीले यांनी केले आहे.

         कोरोना विषाणू मुळे संपूर्ण जगाचे आरोग्य धोक्यात आले असून त्यावर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न सरकार कडून केले जात आहेत. देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून देखील नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचं पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून राळेगण थेरपाळ गावठाण व वाड्या वस्त्यांवर ४ एप्रिल ते ६ एप्रिल तीन दिवस जनता कर्फ्यु ठेवण्यात आला आहे. या दिवशी गावातील व्यक्ती गावाबाहेर जाणार नाही तसेच गावाबाहेरील व्यक्ती गावात येणार नाही. गावातील सर्व अत्यावश्यक दुकाने देखील किराणा, हॉस्पिटल, मेडिकल, भाजीपाला, बँक, पीठ गिरणी सर्व ३ दिवस बंद राहणार आहेत. दूध संकलन सकाळी ६:३० ते ७:३० व सायंकाळी ६:३० ते ७:३० या वेळेत सुरू राहतील. सदर दिवशी वैद्यकीय सेवा तत्काळ सरपंच व वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केल्यास मिळेल.  जनता कर्फ्यु काळात कोणीही नागरिक, युवक विनाकारण वाहन घेऊन फिरल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन वाहन जप्त होईल. तरी सर्वांनी आपल्या घरात राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. तरी सर्व आदेशाचे पालन करून प्रशासन, ग्रामपंचायत यांना सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच पंकज करखिले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments