कारोनाच्या भीतीपोटी खाजगी , सरकारी दवाखाने बंद, वडनेरच्या आजीला मिळेना उपचार.
डॉ श्रीकांत पठारे धावले देवदुतासारखे.
रोख ठोक न्यूज पारनेर
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशभरात संचार बंदी लागू केली असली तरी अत्यावश्यक सेवेत येणारे खासगी, सरकारी हॉस्पिटल, मेडिकल उघडे ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. हा विषाणू इतका भयानक असल्याने डॉक्टर देखील आपल्या जीवाचा विचार करत दवाखाने बंद ठेवत आहेत. बुधवारी (दि.१) रोजी निघोज येथे वडनेर येथून आलेल्या वृद्धेचा उपचारासाठी एकही दवाखाना चालू नसल्याने उपचाराची गैरसोय झाली. ही माहिती पारनेर येथील डॉ श्रीकांत पठारे यांना मिळताच त्यांनी तत्काळ त्या आजीच्या घरी जाऊन उपचार केले. डॉ तुम्ही देवदुतासारखे धावून आले असल्याचे उद्गार यावेळी वृद्ध आजीच्या तोंडून निघाले.
कोरोनामुळे संचारबंदी लागू आहे. त्यात निघोज मधील सर्व खाजगी व सरकारी दवाखाने बंद आहेत. वडनेरच्या वाजेवडीतील वृद्ध आजी खूप आजारी असल्याने सकाळपासून उपचारासाठी आजीच्या नातेवाईकांनी निघोज मधील अनेक दवाखान्यांमध्ये जाऊन उपचारासाठी घरी येण्याची विनवणी केली. परंतु अनेक खाजगी दवाखाने बंद असल्याने कोणीही डॉक्टर उपलब्ध न झाल्याने उपचार होऊ शकला नाही. शेवटी नातेवाईक सरकारी दवाखान्यात देखील जाऊन आले. परंतु तेथे देखील डॉक्टर उपस्थित नसल्याने अजिंवर त्यांच्यावर उपचार झाला नाही. अखेर हताश झालेल्या आजींच्या नातेवाईकांनी माहिती पारनेर येथील ओंकार हॉस्पिटल चे संचालक व पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांना दिली. डॉ पठारे यांनी तत्काळ पारनेर मधून स्वतःचा गाडीत जाऊन त्या आजींना वडनेर (वाजेवाडी) येथे जाऊन उपचार केले. तुम्ही देवदुतसारखे धावून आलात, समाजाप्रती अशीच नाळ जोडून ठेवा ! असे उद्गार त्या आजींनी काढले.
एकीकडे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकार ने सर्व दवाखाने २४ तास खुले ठेवण्याचे आदेश दिले असताना सरकारी दवाखाना देखील सुरू नव्हता, असे आजींनी डॉ पठारे यांना सांगितल्यावर डॉ पठारे यांनी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना फोन करून चांगलीच कान उघाडणी केली. डॉ पठारे यांनी पारनेर वरून सुमारे ३०-३५ किमी अंतरावर स्वखर्चाने जाऊन त्या अजींवर घरी उपचार केले. त्यामुळे डॉ पठारे यांचे सर्वत्र अभर मानण्यात येत आहे. कोरोणाच्या भीतीपोटी व संचार बंदी लागू असल्याने नागरिकांना व रुग्णांना घराबाहेर पडता येत नसल्याने डॉ पठारे हे सध्या घरोघर जाऊन कोरोना विषाणू वर मार्गदर्शन करून रुग्णांना घरी जाऊन उपचार करत आहेत.
जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध - डॉ श्रीकांत पठारे
मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य घेऊन मी वैद्यकीय सेवेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. अडचणीच्या काळात रुग्णांना मदत करणे हाच माझा धर्म असून मी जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असून कोरोना विषाणू व संचारबंदी काळात कुठल्याच रुग्णाची गैरसोय होऊ देणार नाही. गैरसोय होणाऱ्या रुग्णांनी माझ्याशी संपर्क करावा. आपल्याला वैद्यकीय सेवा पुरविली जाईल असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे यांनी केले.
![]() |
वडनेर येथे जाऊन आजींच्या तब्येतीची विचारपूस करून उपचार करताना डॉ श्रीकांत पठारे.
छाया - चंद्रकांत कदम
|

0 Comments