पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा बाबतीत पुनर्विचार करावा - शर्मिला येवले


ग्रामीण भागात नेटवर्क चा घोळ, ऑनलाइन परिक्षेला होणार अडचण
रोख ठोक न्यूज

       दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या होत्या. त्या परीक्षा विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे. परीक्षार्थी विद्यार्थी हे सध्या त्यांच्या गावाकडे असल्याने ग्रामीण भागात सध्या नेटवर्क चा घोळ असल्याने ऑनलाईन परीक्षा होणार कशी ? असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर असून शासनाने यावर पुनर्विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालया ची विद्यार्थिनी प्रतिनिधी व महाराष्ट्र शिवसेना युवती अध्यक्ष  कू. शर्मिला सुभाषराव येवले हिने केली आहे.
    विद्यापीठने ऑनलाईन परीक्षा घेण्याच ठरवलं आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. कोरोणा संकटापासून वाचण्यासाठी पुण्यातील सर्व विद्यार्थी आपापल्या गावी गेलेले आहेत. हे कोरोनाचे संकट लवकर दूर होईल, या विचाराने विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात असणाऱ्या नोट्स,पुस्तक सोबत गावी घेऊन गेले नाहीत. त्यात आता ऑनलाईन परिक्षा होणार असतील तर गावात नेटवर्कचा देखील मोठा घोळ आहे. या संगळ्या अडचणी लक्षात घेऊन पूर्णपणे विचार करून सरकारने यावर निर्णय घ्यावा. सरकार यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल हा विश्वास एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आम्हांला आहेच .आम्ही तशी सरकारी लोकप्रतिनिधी कडे मागणी करतं आहोत. सरकार विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन लवकरच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. असे मत विद्यार्थी प्रतिनिधी व महाराष्ट्र शिवसेना युवती अध्यक्ष कु.शर्मिला सुभाषराव येवले.(फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे.) हिने व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments