फॅमिली मेडिकल शिक्रापूर व ग्रुपकडून शिक्रापूर पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

नागरिकांनी घरामध्ये सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन.

रोख ठोक न्यूज शिक्रापूर

       जीवाची तमा न बाळगता कोरोना या घातक विषानुशी लढून सर्वसामान्य जनतेला कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी काम करत असलेल्या शिक्रापूर परिसरातील पोलिसांना फॅमिली मेडिकल शिक्रापूर व सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
          दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून प्रशासन त्यावर उपाययोजना करत आहे. या विषानुवर "घरी रहा, सुरक्षित रहा" हाच एक मात्र उपाय असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोणीही अत्यावश्यक सेवा  शिवाय घराबाहेर पडू नये, घरात रहा सुरक्षित रहा हे सांगण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आले आहे. प्रत्येक गावात ठिकाणी पोलिस यंत्रणेकडून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून ही पोलिस यंत्रणा व प्रशासन नागरिकांच्या जीवाची काळजी करत नागरिकांसाठी रस्त्यावर उभे आहे. याच पोलिसांच्या आरोग्याचा विचार करत कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी फॅमिली मेडिकल शिक्रापूर, मंगलमूर्ती मेडिकल चौफुला पिंपळे जगताप, शिवांजली मेडिकल करंदी, लाईफ केअर मेडिकल शिक्रापूर यांच्याकडून शिक्रापूर पोलिसांना सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
           त्यावेळी विशाल बेंडभर, पोलीस पाटील वाजे नाना, दिपक ढोकले, प्रदीप जाधव, आकाश खेडकर, ओमकार पवार आदी उपस्थित होते. कोरोना विषाणू वर मात मिळवण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. घरात रहा सुरक्षित रहा. समाजामधील गरजू लोकांना सध्या लॉक डाऊन मुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन प्रशासनाच्या माध्यमातून या गरजूंना मदत करावी. असे आवाहन फॅमिली मेडिकल शिक्रापूर व ग्रुपचे संचालक विशाल बेंडभर व ग्रुप ने केले आहे.


Post a Comment

0 Comments