लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी उलट वाढच होताना दिसत आहे. दिवसेंदिवस शंभर रुग्णांची रोज भरच पडू लागली आहे.
रोख ठोक न्यूज मुंबई
भिवंडीतील या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील हा पहिला कोरोनाबाधीत रुग्ण काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे एका मशिदीत कार्यक्रमात गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने या रुग्णाला पाच दिवसांपूर्वीच भिवंडीतील केंद्रात क्वरंटाईन करण्यात आले होते. मात्र, आता तो कोरोनाबाधित असल्याने त्याच्या कुटुंबातील दोन महिला एक पुरुष आणि एका लहान मुलाला देखील क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. हा रुग्ण राहत असलेला आजूबाजूचा एक किलोमीटर पर्यंतचा परिसर महापालिकेने सील केला आहे. भिवंडीत कालपर्यंत एकही कोरोबाबधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र. आता कोरोनाने भिवंडीत शिरकाव केल्याने शहरासह ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे

0 Comments