निसर्गाशी एकरुप होण हेच विश्वातील सर्वोच्च पद~शरद पवळे

सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी अखेर मौनव्रत सोडले. 

रोखठोक न्यूज पारनेर

 "वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे"या पंक्तीचा उल्लेख करत नारायणगव्हाणमधील चुंभळेश्वरावरील वटवृक्षाला जल अर्पण करताना सर्वांच्या जीवनात प्रेम,आनंद,सुख,शांती,पावित्र्य,क्षमारुपी सद्दगुणांची प्रकाशरुपी बरसात करण्याची प्रार्थना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनीं निसर्गाकडे करत मौन व्रत सोडले.

      नगर- पुणे महामार्गावरील प्रख्यात नारायणगव्हाणमध्ये जगभर कोरोनाचा संसर्ग पसरत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी देशात लाॅकडाउन जाहीर केल्यानंतर सर्व नागरिकांनी घरातच थांबुन घेतले. त्यामुळे प्रशासणाणे तात्काळ नागरिकांना सुविधा पुरावयला सुरवात केली. परंतु प्रशासणापुढे मोठे आव्हाण निर्माण झाले, अशा वेळेत काही नफेखोर दुकानदारांनी संधीचा फायदा शोधत जीवनावश्यक वस्तुंची कृत्रीम साठेबाजारी करत नागरिकांची गैरसोय करत वस्तींचे दर वाढवले. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी अहोत्र काबाड कष्ट करुन नेहमीच हमीभावासाठी शेतकरी संघटनां सोबत जावुन सरकारपुढे आंदोलने केली. अनेक शेतकर्‍यांनी तर कर्जबाजारी होवुन आत्महत्या केल्या. परंतु आजपर्यंत कोणालाच हमीभाव देता आला नाही. त्याचबरोबर मोलमजुरी रोज केल्याशिवाय पोटाला खायला मिळत नाही, तुरुंगात राहीलेले बरे अशी अवस्था, होत असताना अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची केलेली पिळवणुक,  शासणाचे जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीवरील सुटलेले नियंत्रण,  शेतकर्यांचा हमीभावाचा आक्रोश यांना ऐकु येत नाही, म्हणुन सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी महात्मा गांधीच्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा समोर ठेवत नारायणगव्हाणमध्ये ०३ एप्रिल २०२० रोजी मौन धारण करत मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या मागण्यांचे पत्रही पाठवले. परंतु गावकर्‍यांचा मौन थांबवण्याचा आग्रह व लाॅकडाउनचा वाढता कालावधी पाहता नारायणगव्हाणच्या चुंभळेश्वरावरील वटवृक्षाल जल अर्पण करत मौन सोडले.
     लाॅकडाउन संपल्यानंतर पुन्हा जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ व बळीराजाच्या हमीभावासाठी मोठी चळवळ उभारण्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगत, देशातील डाॅक्टरांचे,पोलिस प्रशासणाचे व ज्यांनी ज्यांनी या काळात गोरगरीबांना ,गरजुंना मनोभावे मदत केली त्यांना धन्यवाद दिले. प्रेस मिडीया, इंलेक्र्टाॅनीक मिडीयाला धन्यवाद देत, निसर्गापेक्षा कोणीही मोठे नाही निसर्गावर आक्रमण केल्यामुळे कोरोनासारखी महाभयंकर महामारी आली आहे. त्यामुळे निसर्गाशी एकरुप होवुन निसर्गाच रक्षण करण हेच आपल कर्तव्य समजुन निसर्गरक्षणाचा,वृक्षसंवर्धनाचा संदेशबरोबर नागरिकांनी कोरोनापासुन स्वरक्षण करण्याचे अवाहन देत १४ एप्रिल २०२० रोजी ११ दिवसानंतर १२व्या दिवशी मौन सोडले. यावेळी चुभळेश्वरावरील पुजारी,पाणी फांउडेशनचे सचिन शेळके,पै.अक्षय शेळके हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments