रोख ठोक न्यूज पारनेर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती राळेगण थेरपाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, ग्रामविकास अधिकारी काळापहाड, सेवा सोसायटीचे संचालक सुखदेव कारखिले, पांडुरंग बेंडाले, पै. बाळा कार्ले, ग्रामपंचायत सदस्य किरण कारखिले, मा. सरपंच रामभाऊ सोनवणे, युवा नेते नरेशदादा सोनवणे, पै. काळू सोनवणे, संतोष कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
0 Comments