राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडगे बिनविरोध..

 पारनेर प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पारनेरचे दत्ता गाडगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव डॉ. विश्वासराव अरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील बैठकीमधे नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडगे यांना निवडीचे पत्र देताना प्रदेश सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे व मान्यवर.

     महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अहमदनगर जिल्ह्याची बैठक रविवारी दि. १६ जून रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे संपन्न झाली.यावेळी संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दत्ता गाडगे बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यापूर्वी दत्ता गाडगे यांची जिल्हासचिव पदी बिनविरोध निवड झाली होती.त्याचप्रमाणे पारनेर तालुकाध्यक्ष म्हणून ३ वेळा बिनविरोध राहिले आहेत. त्यांनी तालुकाध्यक्ष व जिल्हा सचिव म्हणून केलेल्या चांगल्या कामाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने प्रदेश पातळीवर दखल घेतली.दत्ता गाडगे यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले.पत्रकार संघाचे माध्यमातुन वृक्षारोपण,गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,पत्रकार सन्मान,माजी सैनिकांचा सन्मान आदीसह, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर जिल्ह्यात  वेळोवेळी आवाज उठविला आणि पत्रकारांना नेहमीच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.त्यांच्या  कार्यकाळात त्यांना मिळालेली पदे ही नेहमी बिनविरोध मिळाली आहेत.त्यांना पत्रकारीतेमधील अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.फळ म्हणून त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा निवड समीती अध्यक्षपदी फायकतअली सैय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हासचिवपदी सुरेश खोसे तर, पारनेर तालुका अध्यक्ष पदी संतोष तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी काम पाहिले.सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे यांनी काम पाहीले.दत्ता गाडगे यांच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखेपाटील, खासदार निलेश लंके,खासदार अमोल कोल्हे,माजी आमदार विजयराव औटी,श्रीविध्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशिल शेरकर, सभापती काशिनाथ दातेसर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरेपाटील,शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख डाॅ.श्रीकांत पठारे आदींनी फोनद्वारे अभिनंदन केले आहे.


  निवड प्रसंगी शिर्डी येथे पारनेर तालुक्यातील पत्रकार संतोष कोरडे, गंगाधर धावडे,वसंत रांधवन,सुधिर पठारे, ठकसेन गायखे,विशाल फटांगडे,संपत वैरागर,रामदास नरड,सचिन जाधव,प्रविण वराळ, चंद्रकांत कदम,नितीन परंडवाल,महेश शिंगोटे,दिपक वरखडे,सोमनाथ गोपाळे,सदानंद सोनावळे,संदिप गाडे,सुदाम दरेकर,राहुल फुंदे आदींसह जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या सखेने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments