कला शिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांना सन्मान कर्तुत्वाचा पुरस्कार जाहीर

 


पारनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र टीचर असोसिएशन धुळे यांच्या वतीने कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे यांना सन्मान कर्तुत्वाचा २०२४ पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार ७ जानेवारी धुळे येथे होणार आहे.


       शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करत असताना सामाजिक भान बाळगून विद्यमान परिस्थितीत आदर्श नागरिक घडवण्याचे काम शिक्षकी पेशातून करीत आहेत. शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक कार्यात आपण नेहमीच शिक्षकांसाठी झटत असून हे कार्य पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन धुळे यांच्या वतीने २०२४ सालातील सन्मान कर्तुत्वाचा हा पुरस्कार पारनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

      या पुरस्काराचे वितरण रविवार ७ जानेवारी २०२४ रोजी रिद्धी सिद्धी लॉन्स पारोळा रोड चौफुली धुळे येथे सकाळी १०:३० वाजता होणार आहे. पुरस्काराचे वितरण शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, आमदार सुनील शिंदे, आमदार कुणाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जी फाळके, आ. आमशादादा पाडवी, शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल शिवसेना उपनेते अद्वय आबा हिरे सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments