वडझिरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक बोकड ठार

 वडझिरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक बोकड ठार


पारनेर प्रतिनिधी-महेश शिंगोटे 



वडझिरे परिसरातील मोरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एक बोकड चा मृत्यू झाला.परिसरात बिबट्याचा वावर वाढू लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मोरे वस्तीवरील शेतकरी रमेश नाथा मोरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या व एक बोकड यांच्यावर रात्री 2 वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता.त्यामध्ये एक बोकड जागीच ठार झाला.सकाळी वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली व पंचनामा केला आहे.बोलताना शेतकरी रमेश मोरे व श्रीकांत मोरे म्हणाले की,वनविभागाने लवकरात लवकर आम्हला नुकसान भरपाई देण्यात यावी.

Post a Comment

0 Comments