आरोग्यमंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार आहे का ?

  • आरोग्यमंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार आहे का ?

आरोग्यमंत्री तानाजी सावंताना शिवबा संघटना व युवासेनेचा सवाल.

पारनेर - प्रतिनिधी महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात  १-२ महिन्यापासून घडत असलेल्या दुर्दैवी घटना मग त्यामध्ये ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय हॉस्पिटल मधील घटना त्यानंतर नांदेड व आता संभाजी नगर अशा विविध शासकीय रुग्णालयात  सुविधेअभावी अपघातात शेकडो जिव गेलेत. हे जिव प्रशासनाच्या चुकिच्या धोरणामुळे गेले असल्याचा आरोप शिवबा संघटना अध्यक्ष तथा युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे यांनी केला.


  यासंदर्भातील निवेदन मेल च्या माध्यमातून आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री याना पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सांवंत तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न त्यानाच विचारण्यात आला आहे. एक घटना घडते तेव्हा ती चुकून होऊ शकते मात्र ज्यावेळी अशा अशा अनेक घटना सातत्याने घडतात त्याला जबाबदार हा प्रशासनाचा व शासनाचा नाकर्तेपणाच असतो.


मुख्यमंत्री हे फक्त नावालाच असल्याचे दिसते आहे. कारण त्यांच्यात कुठलीही निर्णय घेण्याची पात्रता नाही. या प्रकरणाची जबाबदारी आरोग्यमंत्री याचीच आहे. अन त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री यानी घ्यायलाच हवा. अशीहि मागणी शिवबा संघटना व युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments