डॉ श्रीकांत पठारे यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा - माजी आमदार विजयराव औटी


पारनेर चंद्रकांत कदम

शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांचे सामाजिक काम तालुक्यात आदर्शवत सुरू आहे. येत्या निवडणुकीत त्यांना जिल्हा परिषद सदस्य करून त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी आतापासून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी व्यक्त केले. यावेळी औटी यांनी डॉ पठारे यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केली.

वाढदिवसानिमित्त डॉ श्रीकांत पठारे यांना शुभेच्छा देताना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी व समवेत मान्यवर....

          शिवसेना तालुकाप्रमुख व पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांचा ४७ वा वाढदिवस पारनेर तालुक्यातील जवळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देताना औटी म्हणाले की, शिवसेना पक्ष हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या द्विसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. डॉ पठारे शिवसेनेच्या याच द्विसूत्रीवर काम करत असून शिवसेनेला साजेसं काम ते करत आहेत. डॉ पठारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. यावर्षी ते पंचायत समिती सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख आहेत पुढच्या वर्षी डॉ पठारे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. यासाठी उपस्थित सर्वांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे असे औटी म्हणाले. राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना औटी म्हणाले की, माझा पक्ष अडचणीत असताना पक्षाला सोडून जाणाऱ्यांपैकी मी नाही. मी निष्ठा टिकवून ठेवली आहे. निष्ठा टिकवली नाही तर मी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणवून घेण्याच्या पात्रतेचा नाही असेही औटी म्हणाले.

वाढदिवसानिमित्त जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वाद घेताना शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे.

            यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना महिला आघाडीच्या प्रियांका खिलारी, राहुल पाटील शिंदे, माजी नगराध्यक्ष शंकर नगरे, पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, निघोजचे सरपंच सचिन वराळ, अशोकराव शेळके, माजी सरपंच अपधुप जयसिंगराव गवळी, पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर, प्राचार्य डॉ अमोल शहा, सरपंच कडूस मनोज मुंगसे, उपसरपंच पळवे गंगाराम कळसकर, सामाजिक कार्यकर्ते प्रताप काळे, सरपंच सुपे योगेश रोकडे, उपसरपंच दत्ता पवार, नगरसेवक युवराज पठारे, नगरसेवक राजू शेठ शेख, यांच्यासह तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थेचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तरुण मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुशिक्षित तरुणांची आज राजकारणात गरज - अण्णा हजारे

    डॉ श्रीकांत पठारे यांचे सामाजिक काम मोठ्या प्रमाणात आहे.कोरोनाच्या काळात त्यांनी तालुक्यातील जनतेची केलेली सेवा उल्लेखनीय आहे. डॉ श्रीकांत पठारे यांच्या सारख्या सुशिक्षित व उमद्या तरुणांची आज महाराष्ट्राला गरज आहे. त्यांना भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा अश्या शुभेच्छा जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी डॉ श्रीकांत पठारे यांना भेटीदरम्यान दिल्या.

Post a Comment

0 Comments