पारनेर प्रतिनिधी
"नगर जिल्ह्याचे सुपुत्र डॉ स्वप्निल भालेकर यांनी अंधांना दृष्टी देण्याचे पवित्र काम अविराहत चालू ठेवावे, हे कार्य किती मोठे आहे याच जिवंत उदाहरण मी इथे देतो, असे म्हणत एक नेत्र रोपण झालेल्या एका मुलालाच ना थोरतांनी स्टेजवर बोलावले, हा चमत्कार व्हिजन केअर सेंटर येथे झाल्याचे हे उदाहरण" अश्या शब्दात डॉ स्वप्नील भालेकर यांचे कौतुक महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले. व्हिजन केअर सेंटर शिरूर च्या लॅसिक्स उपचार मशीनचे उदघाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे,शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार ,अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके,पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके,राहुल शिंदे,बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड हेही उपस्थित होते.
व्हिजन केअर सेंटरने आजपर्यंत 10 हजार पेक्षा जास्त मोतीबिंदू आणि हजारो नेत्ररोपणासोबत जवळपास 1 लाखाच्या वर नेत्र तपासण्या करून ग्रामीण भागातील नेत्रसेवेचे एक मानांकन स्थापित केल्याचे प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याचे नाव जगभरात पोहोचवत सीरिया सारख्या देशात बॉम्ब चे छरे डोळ्यात गेलेले रुग्ण आमच्या शिरूर तालुक्यात डोळ्यांवर उपचार घेऊन जातात हे आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे ,आतापर्यंत जगातील अनेक देशातून रुग्ण येथे उपचार घेऊन गेले आणि एक जागतिक सेंटर म्हनून व्हिजन केअर नावारूपाला आले असे आमदार अशोकबापू पवार यांनी याप्रसंगी सांगितले.
भाऊसाहेब भालेकर यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा केली,सचिन भालेकर हे परिवर्तन च्या माध्यमातून पारनेर सामाजिक कार्य करत आहेत आणि डॉ स्वप्नील भालेकर आणि डॉ सोनल भालेकर यांनी नेत्रसेवेत सर्वोच्च काम केले आहे आणि या कुटुंबाने नेहमी सेवाभाव जपला असे यावेळी बोलताना आमदार सुधीर तांबे म्हणाले
नुसते पुणे नगर नव्हे तर देशात सगळ्यात स्वस्त लॅसिक्स उपचार हे शिरूर मध्ये आम्ही देऊ आणि त्यातही कुणी अतिशय गरीब असेल तर अल्प दारात ही सेवा पुरवू, सैन्य भरती ,लग्न या वेळी चष्म्याचा होणार त्रास आता दूर होईल आणि नंबर घालवणे अजून सोपे होईल ,आपले मशीन हे जगातील अतिशय अत्याधुनिक मशीन आहे अशी माहिती यावेळी बोलताना डॉक्टर स्वप्नील भालेकर यांनी दिली.
0 Comments