वाढदिवसानिमित्त गरजूंना साहित्य वाटप
माजी सैनिकांचा होणार सन्मान
आमदार लंके यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे होणार उद्घाटन
पारनेर प्रतिनिधी :
सामाजिक कामांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या वडनेर हवेली गावांमध्ये राबवून आजच्या युवकांसाठी आदर्श असे काम करणारे इंजि. सतीश उर्फ बापू भालेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.
पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा घेऊन तालुक्यात व आपल्या वडनेर हवेली या गावांमध्ये नेहमीच सामाजिक कामांच्या माध्यमातून कार्यरत असलेले इंजिनीयर सतीश उर्फ बापू भालेकर यांचा वाढदिवस सर्वसामान्य गरजू लोकांना साहित्य वाटप करून साजरा करण्यात येणार आहे. इंजिनीयर सतीश उर्फ बापू भालेकर यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्याचे ठरवले असून वडनेर हवेली तसेच परिसरामध्ये हा उपक्रम एक आदर्श सामाजिक उपक्रम साजरा होत आहे.
दरम्यान आमदार निलेश लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून इंजिनिअर सतीश उर्फ बापू भालेकर यांनी तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले असून आजपर्यंत त्यांनी अनेक बेरोजगार युवकांना पुणे-मुंबई याठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते तालुक्यात आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम असं सामाजिक कार्य करत आहेत.
दरम्यान इंजि. सतीश उर्फ बापू भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुला-मुलींना सायकल वाटप भजनी मंडळ साहित्य वाटप (टाळ पखवाद, पेटी, तबला) गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप, क्रिकेट किट वाटप, नाभिक समाजाला किट वाटप, आजी-माजी सैनिक संघटनांचा सन्मान हा कार्यक्रम सोहळा वाढदिवसानिमित्त वडनेर हवेली येथील मारुती मंदिरासमोर शुक्रवार दि. १२ रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे अशी माहिती इंजिनीयर सतीश उर्फ बापू भालेकर मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे बंधू शशिकांत भालेकर यांनी दिली आहे.
हा कार्यक्रम पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते संपन्न होत असून यावेळी रामवाडी रस्ता (अंदाजे किंमत २० लक्ष), मोकळी वाढ केटीवेअर (अंदाजे किंमत १५ लक्ष), शिंदेमळा सीडी वर्क (अंदाजे किंमत १५ लक्ष) या विकासकामांचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे.
0 Comments