कान्हूर पठार मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी राजे उमाजी नाईक मित्र मंडळ कान्हूर पठार व ग्रामस्थ कान्हूर पठार यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा
गौरव उपस्थितांनी केला.या वेळी बन्सी गायकवाड, प्रशांत बोऱ्हाडे, सचिन खोमणे, दत्तात्रय गायकवाड, अमोल ठुबे, राजू गायकवाड आदी उपस्थित होते.


0 Comments