शिवसेना हा सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा पक्ष - माजी सरपंच किसन सुपेकर
पारनेर प्रतिनिधी
आरोग्य शिबिरे, गरजूंना आर्थिक मदत, यांसह सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वसामान्यांशी नाळ असणारा पक्ष म्हणजे "शिवसेना" पक्ष असल्याचे मत पठारवाडीचे माजी सरपंच व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख किसनराव सुपेकर यांनी व्यक्त केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई - ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथे आरोग्य चिकित्सा व नेत्र परीक्षण चष्मा व औषध वाटप शिबीर घेण्यात आले.
शिवसेना उपतालुकाप्रमुख किसनराव सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्ते पिराजी पावर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ श्रीकांतजी पठारे यांच्या हस्ते उदघाटन करून हे शिबीर घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच सुपेकर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. शिवसेना हा ८०% समाजकारण व २०% राजकारण करणारा पक्ष आहे. शिवसेनेचे पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे हे शिवसेना पक्षाला साजेसे सामाजिक काम करत आहेत.कोरोनाच्या काळात हजारो कोरोना रुग्णांना मोफत उपचार देणारे डॉ श्रीकांत पठारे यांचे काम तालुक्याला आदर्शवत आहे.
शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी सरपंच भास्करराव सुपेकर, उपसरपंच मारुती पठारे, चेअरमन सुखदेव पठारे, संपत सालके, बबन पवार, मा,सरपंच सुरेश पठारे, ग्रा प सदस्य भिका पठारे, सुनील पठारे, सुनील सुपेकर, नितीन सुपेकर, संदीप पाटील सुपेकर, मोहनशेठ सुपेकर, दत्ता बबन, पठारे मोहनशेठ पवार, ग्रा प सदस्य दौलत सुपेकर, अनिल सुपेकर, जयशिंग पवार साहेब, गणेश पवार, बाजीराव पवार, अरुण पवार, वैभव पवार, सौरभ पवार, योगेश पवार, ज्ञानदेव पवार, विकास गवळी, सुधीर पवार, राहुल पठारे, इंद्रभान सुपेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments