ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून सराईत आरोपींना जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश

 



चंद्रकांत कदम पारनेर

 अपहरण झालेल्या युवकाची माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील युवकांना मिळाल्याने तातडीने युवकांनी एकत्र येत व पोलिसांच्या मदतीने अपहरण कर्त्या युवकाला वाचविण्यात यश आले. अपहरण करनाऱ्या तीन आरोपींना देखील अटक करण्यात आली असून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून सराईत आरोपींना जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.


याबाबत सविस्तर असे की, मंगळवार दि. ६ जुलै रोजी पिंपरी जलसेन येथील आकाश काळे नामक युवकाचे त्याच्या राहत्या घरातून अज्ञातांनी अपहरण केले होते. अपहरण केले असल्याची माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन नंबर वरून गावातील ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने सदस्यांनी एकमेकांना फोन करून पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेऊन अपहरण करण्यात आलेल्या इनोव्हा गाडीचा पाठलाग करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका करून घेण्यात यश आले. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीम ने  अपहरण झालेल्या आकाश काळेला वडझिरे ला सोडूनइनोव्हा गाडी पुणेवाडीच्या दिशेने जात असताना पाठलाग केला असता इनोव्हा गाडी तिथेच सोडून अपहरण करणारे अंधारात पळून गेले. अपहरण केलेल्या इसमांपैकी सचिन बाबाजी बोरुडे, अशोक दत्तू बोरुडे दोघे रा. पुणेवाडी व संग्राम चंद्रकांत कावरे रा वरखेड मळा पारनेर यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी यापूर्वी सुरेश गोपाललाल कुमावत रा.जयपूर राजस्थान यांच्याकडे २ लाखांची खंडणी मागितली होती. परंतु खंडणी देण्यास नकार दिल्याने कुमावत यांचे अपहरण करून त्यांच्या खिशातील रोख ९३ हजार रुपये खात्यावरील १ लाख ३१ हजार रुपये फोनपे द्वारे बळजबरीने आरोपींनी स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले होते. या प्रकरणामध्ये आरोपींना साथ देणाऱ्या गणेश चंद्रकांत कावरे यास देखील पोलिसांनी अटक केली आहे. 


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, विजयकुमार बोत्रे, हनुमान उगले, पोलीस नाईक सुधीर खाडे, पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सूरज कदम, सत्यजित शिंदे, गहिनीनाथ यादव, बाळासाहेब भापसे, सुमित अधाट, पोपट मोकाते आदींनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून अतिशय वेगवान पद्धतीने आरोपींना जेरबंद केले.


ग्रामसुरक्षा यंत्रणा व सदस्यांच्या सतर्कतेमुळे आरोपींना पकडण्यात यश आले 

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन नंबर वरून फोन आल्यानंतर सदस्यांनी तत्परता दाखवल्यामुळे व तत्परतेमुळे अपहरण झालेल्या युवकाला शोधण्यात व आरोपींना पकडण्यात यश आले आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेतील सदस्यांनी अशीच तत्परता नेहमी दाखवल्यास आपल्या भागातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप म्हणाले.

Post a Comment

0 Comments