शिवपानंद शेतरस्ते व पुरातन जलस्रोतांच्या दुरुस्तीसाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार ~शरद पवळे


कोरोनाला हरवून पुन्हा दर्जेदार शिवपानंद शेतरस्त्यांच्या लढाईसाठी सज्ज होणार ~शरद पवळे

पारनेर तहसीलमध्ये सर्वात जास्त शेतरस्त्यांच्या  मागणीचे अर्ज दाखल~ शरद पवळे

एक ना एक शिवपानंद शेतरस्ता खुला होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही~ शरद पवळे


पारनेर प्रतिनिधी

 शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्या शेत रस्त्यांसाठी चाललेला संघर्ष संपवण्यासाठी शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतरस्त्यांच्या  सुरू केलेल्या चळवळीला राज्यात व्यापकता येत असताना कोरोनामुळे प्रशासनावर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे कोरोनाचे महासंकट चळवळीलाही त्रासदायक ठरले तरी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सुरू केलेल्या सप्तपदी अभियानास पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या माध्यमातून आधार फाउंडेशन संचलित शिवानंद कृती समितीने पारनेर तालुक्यात मोठी जनजागृती केली व जिल्ह्यात सर्वात जास्त मागणीसाठीचे अर्ज पारनेर तालुक्यात करण्यात आले पावसाळ्यात निर्माण झालेली अडचण पाहता अनेक शेतकरी आजही अर्ज दाखल करत आहेत तरी गावोगावी प्रलंबित असणाऱ्या शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे आपापसात होणारे तंटे, रस्त्याअभावी जमिनी विकणे, शेतमाल बाजारात नेण्यासाठी होणारी जीवघेणी कसरत थांबवण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला सूचना करत असताना शेतरस्त्यांसोबरोबर पाण्याचा निर्माण होणारा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना सदर प्रश्नांसंदर्भात गांभीर्याने लक्ष घालण्यासाठी दर्जेदार शेतरस्ते व सक्षम जलस्रोतांसाठी भरीव रक्कम नव्या अर्थसंकल्पात जाहीर करावी व शेत रस्त्यांबरोबर जलस्रोतांची कामे तातडीने करावी व येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात याव्यात यासंदर्भात मागणी करणार असून एक ना एक शिवानंद शेतरस्ता व पुरातन जलस्रोतांची कामे पूर्ण झाल्याशिवाय लढा चालू ठेवणार असल्याचे आधार फाउंडेशन संचलित शिवानंद शेत रस्ते नवनिर्माण कृती समितीचे शरद पवळे,संजय कनिच्छे, रघुनाथ कुलकर्णी,भास्कर शिंदे,ॲड. समीर लांळगे, श्रीनिवास शिंदे, सूर्यकांत सालके,पांडुरंग कळमकर,विजय मल्लाव, बाळासाहेब औटी,अशोक आबुज,संपत जाधव, भाऊसाहेब वाळुंज आदींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments