वासुंदे येथे उद्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन ; ३४ लक्ष रुपये किमतीच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

 


वासुंदे येथे उद्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन


 ३४ लक्ष रुपये किमतीच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन



  पारनेर/प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे उद्या विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे. वासुंदे येथे आर. सी. सी. जलकुंभ बांधणी व   ठुबे वस्ती येथे पाण्याची टाकी व  शिरतार वस्ती येथे पाणी पुरवठा योजना एकूण २० लक्ष रुपये तसेच  वासुंदे  येथील दशक्रिया विधी शेड करणे व सार्वजनिक शौचालय बांधणे एकूण 14 लक्ष रुपये आशा विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.  कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम वासुंदे येथे उद्या  दि. 12 रोजी सकाळी ठीक १० वाजता संपन्न होणार आहे.  अशी माहिती वासुंदे ग्रामपंचायत सरपंच सौ. सुमन रंगनाथ सैद व उपसरपंच शंकर मनोहर बर्वे तसेच ग्रामविकास अधिकारी भास्कर लोंढे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments