पठारवाडीचे सरपंच भास्कर सुपेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

 


पठारवाडीचे सरपंच भास्कर सुपेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

 वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण

महिलांनी केले रक्तदान ; तालुक्यात चर्चेचा विषय

पारनेर प्रतिनिधी


पारनेर तालुक्यातील पठारवाडी गावचे कार्यसम्राट सरपंच भास्करराव सुपेकर यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे महिलांनी केलेले रक्तदान हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.


        ११ जून हा सरपंच भास्करराव सुपेकर यांचा वाढदिवस. सध्या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तसेच रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून सरपंच भास्कर सुपेकर यांच्या संकल्पनेतून व युवा नेते कुंडलिक पठारे,माजी उपसरपंच शंकरराव पठारे, ग्रा. प सदस्य नितीन सुपेकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. भैरवनाथ मंदिरासमोर वृक्षारोपण करण्यात आले व विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभामंडपात रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच व शिवसेना तालुका उपप्रमुख जेष्ठ नेते किसनराव सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनी देखील रक्तदान करून अनोखा आदर्श उभा केला आहे. महिलांनी केलेल्या रक्तदानाची तालुक्यातून चर्चा होत आहे. 


 यावेळी सरपंच भास्करराव सुपेकर ,वि का से सो चे चेअरमन सुखदेव पठारे,उपसरपंच मारुती पठारे,ग्रामसेवक देंडगे भाऊसाहेब,निघोज ग्रा प सदस्य गणेश कवाद, मुलीका देवी चे प्राचार्य रामचंद्र सुपेकर सर,ग्रा प सदस्य भिका पठारे,ग्रा प सदस्य दौलत सुपेकर,मोहनशेठ सुपेकर, मा,उपसरपंच सदस्य शंकरराव पठारे,युवा नेते कुंडलीकराव पठारे,गुलाब पठारे,नितीन सुपेकर सर,सुलतान सय्यद,अनिल सुपेकर, मोहन पवार,मंगेश बोदगे,बबनराव पावर,सुनील पठारे,किरण सुपेकर,रभाजी पठारे,योगेश सुपेकर साहेब,योगेश बोदगे,इंद्रभान सुपेकर, गणेश पवार,पिंटू तांबे,रवींद्र गिरी,यलाप्पा तेलंग,सोमनाथ गिरी, राहुल पठारे, पोपट राऊत, निलेश पठारे,सोमनाथ सुपेकर,शशी पठारे,ज्ञानदेव पवार,संकेत सुपेकर,राहुल केदारी,गौरव सुपेकर,संदीप पाटील सुपेकर, किरण पवार विलास पठारे, युवराज सुपेकर,भरत पवार  व इतर ही अनेक मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments