लवकरच आपल्या सर्व रुग्णांच्या सेवेत दाखल होणार - डॉ श्रीकांत पठारे रुग्णालयातून उपचार घेताना देतात रुग्णांना धीर
कोव्हीड सेंटर पूर्ववत सुरू राहणार
तहसीलदार ज्योती देवरे व ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ उंद्रे यांच्या अधिपत्याखाली रुग्णांवर होणार उपचार
चंद्रकांत कदम पारनेर
पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी स्वतःच्या दवाखान्यात विलगिकरणात उपचार सुरू आहेत. डॉ पठारे यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर अनेक रुग्ण व नातेवाईक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करून चिंतेत होते. आज डॉक्टरांनी रुग्णांना व जनतेला आवाहन करत सांगितले आहे की, मायबाप जनतेहो तुमच्या आशीर्वादामुळे मी बरा आहे, लवकरच आपल्या सर्व रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. कोव्हीड सेंटर हे पूर्ववत सुरू असून त्याठिकाच्या सर्व रुग्णांची चौकशी करून मी क्षणाक्षणाला आढावा घेत आहे. तहसीलदार ज्योती देवरे व पारनेर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ उंद्रे मॅडम यांच्या अधिपत्याखाली रुग्णांवर उपचार होणार आहे.पूर्णवाद भवन येथे सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांना कसलीच कमतरता पडणार नाही. असा धीर पारनेर तालुक्यातील जनतेला व रुग्णांना डॉ श्रीकांत पठारे यांनी दिला आहे.
पारनेर येथे पूर्णवाद भवन ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड डॉ श्रीकांत पठारे यांच्या देखरेखीखाली कोव्हीड सेंटर सुरू केले होते. त्याठिकाणी त्यांनी आतापर्यंत सुमारे ४०० ते ५०० रुग्णांना बरे करून घरी सोडले आहे. शुक्रवारी थोडा ताप व खोकला जाणवल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. कोरोना ग्रस्त रुग्णांची सेवा करताना डॉ श्रीकांत पठारे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पारनेर तालुक्यातील नागरिकांनी व कोव्हीड रुग्णांनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी डॉ श्रीकांत पठारे कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करून साकडे घातले.
डॉ श्रीकांत पठारे हे विलगिकरणात उपचार घेत आहेत. कोव्हीड रुग्णांप्रति व त्यांच्या सेवेप्रति आदर असणारे डॉक्टरांनी स्वतः आजारी असताना कोव्हीड रुग्णांच्या आरोग्याची चौकशी करत कोव्हिड सेंटरमध्ये राऊंड घेतला. आपण सुरू केलेले पूर्णवाद भवन येथील ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड कोव्हीड सेन्टर हे नेहमीप्रमाणे पूर्ववत सुरू राहणार आहे. रुग्णांना उपचारात कुठलीच कमतरता भासनार नाही. आणखी उपचारासाठी तहसीलदार ज्योती देवरे व ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ उंद्रे यांच्या अधिपत्याखाली रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांनी व नातेवाईकांनी तसेच पारनेर तालुक्यातील जनतेने अजिबात घाबरण्याचे कारण नाही. मी आता बरा आहे. मी क्षणाक्षणाला रुग्णांच्या उपचाराचा आढावा घेत असून मला जसे अराम भेटेल तसे दिवसातून १,२ वेळा कोव्हीड सेंटरमध्ये राऊंड घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ श्रीकांत पठारे यांनी सांगून पारनेर तालुक्यातील जनतेला व रुग्णांना धीर दिला आहे.

0 Comments