पारनेर तालुका वाहतूक संघटना ठाणे - मुंबई यांच्याकडून पारनेर कोव्हीड सेंटरला ऑक्सिमिटर भेट
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील मुंबई स्थित असणाऱ्या पारनेर तालुका वाहतूक संघटना ठाणे- मुंबई यांच्याकडून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड डॉ श्रीकांत पठारे संचलित पूर्णवाद भवन येथील कोव्हीड सेंटरला रुग्णांसाठी ऑक्सिमिटर भेट देण्यात आले.
पारनेर तालुक्याचे रहिवाशी असलेले व सध्या मुंबई येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या पारनेर करांची मुबंई येथे वाहतूक संघटना आहे. या संघटनेच्या वतीने पारनेर तालुक्यासाठी नेहमी काही न काही सामाजिक उपक्रम राबविले जातात.सध्या डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला चा राज्यातील बोलबाला ऐकून ते डॉ पठारे यांच्या कामावर भारून गेले. डॉ श्रीकांत पठारे हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांच्या बचावासाठी ५० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोव्हीड सेंटर उभारणार असल्याची बातमी समजल्यानंतर आम्हा मुंबईस्थित पारनेरकारांना डॉक्टरांच्या सामाजिक कामाचा अभिमान वाटला, त्या अनुषंगाने आम्ही देखील या कोव्हीड सेंटरला सामाजिक कामाचा खारीचा वाटा द्यावा म्हणून आज ऑक्सिमिटर दिली असल्याची प्रतिक्रिया पारनेर तालुका वाहतूक संघटना ठाणे- मुंबईचे पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी पारनेर तालुका वाहतूक संघटना ठाणे - मुंबईचे पदाधिकारी व डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे,पूनम खोडदे, दिपाली शेळके, नवनाथ निमोणकर, प्रशांत निंबाळकर, भाऊसाहेब निमोणकर, निकिता औटी, स्नेहल उमाप, महेश उमाप, अक्षय फाफाळे, संतोष फाफाळे, अभिजित झावरे, संध्या गुंड, शीतल चत्तर, आदी कोव्हीड सेंटरमधील स्टाफ व सयंसेवक उपस्थित होते.


0 Comments