वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त मावळे परिवाराकडून कोव्हीड सेंटर येथे अन्नदान

वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त मावळे परिवाराकडून कोव्हीड सेंटर येथे अन्नदान

पारनेर प्रतिनिधी

    पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील कै. गेनूभाऊ मांजाबा मावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मावळे परिवाराकडून पारनेर येथील डॉ श्रीकांत पठारे संचलित पूर्णवाद भवन येथील कोव्हीड सेंटरला एकदिवशीय अन्नदान केले. कोरोनाच्या काळात सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत कोव्हीड सेंटरला मदत करण्याचे आवाहन देखील मावळे परिवाराने केले आहे.


       डॉ श्रीकांत पठारे हे कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करत असल्याचा बोलबाला राज्यभर झाला आहे. खासगी दवाखाना चालवणारा डॉक्टर कोरोना रुग्णांना कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून मोफत उपचार करत आहे. अशी ओळख डॉ श्रीकांत पठारे यांची झाली आहे. डॉ पठारे यांचे सामाजिक काम वाखाणण्याजोगे असून त्यांच्या या सामाजिक कामावर प्रेरित होऊन आम्ही आमच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कोव्हीड सेंटरला अन्नदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सहकार क्षेत्रात रायगड येथे उच्चपदस्थ अधिकारी गोपाळा गेनू मावळे, लोणीमावळ्याचे सेवा संस्थेचे चेअरमन डॉ सुभाष गेनू मावळे, सरपंच डॉ वंदना सुभाष मावळे या मावळे परिवारातील सदस्यांनी सांगितले. कोव्हीड सेंटर येथे अन्नदानासाठी ५५५५ रु देण्यात आले, यावेळी सरपंच गणेशशेठ मापारी, माजी सरपंच अशोक शेळके, चेअरमन रावसाहेब शेंडकर, अशोक शेटे, पप्पू कोल्हे, शंकर शेंडकर आदी उपस्थित होते. 


  यावेळी डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे,पूनम खोडदे, दिपाली शेळके, नवनाथ निमोणकर, प्रशांत निंबाळकर, भाऊसाहेब निमोणकर, निकिता औटी, स्नेहल उमाप, महेश उमाप, अक्षय फाफाळे, संतोष फाफाळे, अभिजित झावरे, संध्या गुंड, शीतल चत्तर, आदी कोव्हीड सेंटरमधील स्टाफ व सयंसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments