डॉ पठारेंच्या माध्यमातून वडुले गावचे राज्यभर नाव गाजले
पारनेर
डॉ श्रीकांत पठारे यांचे कार्य संपूर्ण राज्यात गाजत आहे.महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी डॉ श्रीकांत पठारे यांच्या कामाचे कौतुक केले याचा आम्हा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. असे मत वडुले गावचे सरपंच शिवाजी भापकर (मेजर) व उपसरपंच विष्णू कंद यांनी व्यक्त केले.
डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला वडुले ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार विजयराव औटी, तहसीलदार ज्योती देवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या हस्ते स्पीकर सेट भेट दिला. यावेळी बोलताना सरपंच भापकर म्हणाले की, डॉ श्रीकांत पठारे हे वडुल्याचे सुपुत्र असून आम्ही वर्गमित्र आहोत. लहानपणापासून चिकाटी व मेहनती व समाजसेवेची आवड असणाऱ्या श्रीकांत पठारे हे पुढे जाऊन डॉक्टर झाले. डॉक्टरी पेशा स्वीकारून त्यांनी जनतेची सेवा करण्याचे व्रत घेतले. सध्या कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत असून त्यांचा नावलौकिक राज्यभर झाला आहे. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी देखील डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला. आमच्या गावचा सुपुत्र राज्यात नाव कमवत असल्याचा आम्हा ग्रामस्थांना अभिमान असल्यासाचे मत सरपंच भापकर यांनी व्यक्त केले. यापुढील काळात सर्वोत्तपरी मदत वडुले ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल असे देखील ते बोलले. यावेळी डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे, उद्योजक गवरामशेठ नवले आदी उपस्थित होते.

0 Comments