कोरोनाच्या नावाखाली खासगी डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची केली जातेय दिशाभूल ; आरोग्यअधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टरांसोबत तातडीची बैठक घेऊन कोव्हीड उपचारसंबंधी सूचना द्याव्यात
मनसे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांचे आरोग्यअधिकाऱ्यांना निवेदन
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सर्व खासगी हाॅस्पीटल मध्ये कोरोणा रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाचा एचआर्सिटी स्कोर, ऑक्सिजन लेव्हल, रेमेडीसीवीर इंजेक्षन आदी च्या नावाखाली भिती निर्माण केली जात आहे. असा आरोप करत तालुका ओरोग्यअधिकार्यांनी खाजगी हाॅस्पिटल डाँक्टर यांची तातडीने बैठक घेऊन नागरिकांच्या कोविडच्या उपचारपद्धतीसंदर्भात मार्गदर्शन सुचना करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी तालुका आरोग्यअधिकारी डॉ प्रकाश लालगे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्मिन सेना पारनेर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले असून यात असे म्हटले आहे की, आज पारनेर तालुक्यात कोरोणा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या काळात सद्ध्याची परिस्थिती पाहता निदर्शनास आले आहे की, कोरोणा ची टेस्ट पाॅझीटीव आली की लगेच एच आर सिटी चेक केला जातो. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने ते खासगी दवाखाण्यात रुग्ण घेऊन जाणे पसंद करतात तेथील डॉक्टर एचआर्सिटी स्कोर 5,6,7,किती ही असो लगेच रेमडीसिवीर इंजेक्शन आणण्यास सांगीतले जाते. व ही सर्व बोलणी पेशंन्ट च्या समोर नातेवांईकांना सांगुन पेशंटमध्ये भिती निर्माण केली जात आहे. सध्याच्या काळात या इंजेक्शनचा एवढा तुटवडा निर्माण झाला असून इंजेक्शन मिळणे अवघड झाले आहे. त्यात आणखी एक धक्कादाय गोष्ट समोर येत आहे की, रुग्णासोबत रेमडीसिवीर इंजेक्शन नसेल तर रुग्णांना हाॅस्पीटल मध्ये भरतीच केले जात नाही. आज अशा परिस्थितित रुग्णाना आधार देऊन उपचार करने गरजेचे आहे. आशा परिस्थितीत सगळ्याच ठीकाणी नाही पण काही ठीकाणी डाँक्टरांच्या आडमुठे धोरणामुळे पेशंन्ट व नातेवाईक यांना नाहक दिशाभूल करून मनस्थाप सहण करावा लागत आहे. डॉक्टर रेमडीसिवीर इंजेक्शन आणायला सांगतात व सध्या जनता कर्फ्यू लागला आहे. आशा परिस्थितीत इंजेक्शन आणणे गरजेचे असताना देखील नातेवाईकांना बाहेर पडता येत नाही. नातेवाईक उन्हात फिरत आहेत त्यांना पोलिसांनी आडवले तर अक्षरशः नातेवाईक पोलिसांच्या पाया पडून विनवणी करतात, रडतात, हे मन हेलावणारे दृष्य सध्या पारनेर तालुक्यात पहावयास मिळत आहे. मेडिकल स्टोर मध्ये लगेच पैशाची मागणी केली जाते. एक मेडिकल स्टोर मध्ये हेलवणारी घटना समोर घडली असून आई,बाप,भाऊ,सगळे पाॅझीटीव सगळे दवाखान्यात 24 वर्षाची मुलगी मेडिकल स्टोर मध्ये हात जोडुण, पाया पडत होती रडत होती औषधाचे पैसे 20000 झाले व तिच्याकडे 10000होते , व उर्वरीत रुक्कम बिड वरुन नातेवाईक घेऊन येत आहे. आले की लगेच देते, उपचार चालु करा, पण "मेडिकल स्टोरमध्ये सगळे भरा तरच औषध नाही तर दहा हजाराचीच घ्या" असे सांगीतले. मी हे सर्व माझ्या डोळ्यानी पाहीले शेवटी जाब विचारताच माफी मागुन औषध दिली।. धक्कादाय गोष्ट म्हणजे हाॅस्पीटल डाँक्टरचेच मेडिकल होते. असे मनसे उपाध्यक्ष अविनाश पवार सांगतात. हा सर्व प्रकार थांबला पाहीजे ही विनंती आहे.हे जर असेच चालु राहीले तर नावीलाजाने हाॅस्पीटल ला मनसे स्टाइल धडा शिकवला जाईल. तरी आपण तातडीने तालुक्यातील खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना कोव्हीड उपचारसंबंधी सूचना व माणुसकी धर्म जपण्याबाबत सांगण्यात यावे. अशी विनंती निवेदनाद्वारे मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी आरोग्यधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

0 Comments