डॉ पठारेंनी सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरला दैठणे गुंजाळच्या युवकाकडून मोफत रुग्णवाहिका

 डॉ पठारेंनी सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरला दैठणे गुंजाळच्या युवकाकडून मोफत रुग्णवाहिका 


जेमतेम परिस्थिती असणाऱ्या दैठणे गुंजाळ येथील किरण गुंजाळ  यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली



पारनेर प्रतिनिधी


पारनेर तालुक्यात डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सुरू केलेल्या डेडिकेटेड १०० बेडच्या कोव्हीड सेंटर ला दैठणे गुंजाळ येथील किरण गुंजाळ या युवकाने सर्वसोयीनयुक्त असणारी रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून दिली आहे. जोपर्यंत हे कोव्हीड सेंटर सुरू आहे तोपर्यंत ही रुग्णवाहिका अगदी मोफत रुग्णांच्या सेवेत असणार आहे.

        ओंकार हॉस्पिटल चे संचालक व पारनेर पंचायत समितीचे सदस्य डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने पारनेर येथे १०० बेडचे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. डॉ पठारेंनी सुरू केलेल्या कोव्हीड सेंटर ला 2 दिवसात 50 ते 60 रुग्ण उपचार घेत आहेत. नुकतेच या कोव्हीड सेंटरला पारनेरचे आमदार निलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व डॉ पठारे यांनी सुरु केलेल्या सामाजिक कामाबद्दल त्यांचे कौतुक केले. डॉ पठारे यांनी सुरू केलेल्या सामाजिक कामावर तालुक्यातील अनेक जण प्रेरित होत असून दैठणे गुंजाळ येथील जेमतेम परिस्थिती असणारा युवक किरण गुंजाळ यांनी या कोव्हीड सेंटरला स्वयंस्फूर्तीने रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.पारनेर येथे डॉ श्रीकांत पठारे यांची भेट घेऊन ही अद्ययावत रुग्णवाहिका कोव्हीड सेंटर मधील रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली. यावेळी डॉ श्रीकांत पठारे, प्रमोद पठारे, डॉ पद्मजा पठारे, किरण गुंजाळ आदी उपस्थित होते. कोरोना ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यापर्यंत येण्यासाठी ही रुग्णवाहिका मोफत सेवा देणार असून त्यासाठी किरण गुंजाळ 8484848339 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


संपूर्ण तालुक्याला डॉ श्रीकांत पठारे यांचे सामाजिक काम ज्ञात आहे. डॉ श्रीकांत पठारे यांच्या सामाजिक कामावर प्रेरित होऊन समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे या उदात्त हेतूने व डॉ पठारेंच्या कामावर प्रेरित होऊन मी कोव्हीड सेंटरला रुग्णवाहिका मोफत देत आहे.समाजातील दानशूरांनी व सर्वांनीच डॉ पठारेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक काम करायला समोर यायला हवं.

किरण गुंजाळ (रुग्णवाहिका मालक)

Post a Comment

0 Comments