शरद पवळेंच्या पाठपुराव्याला यश
पारनेर प्रतिनिधी
राज्यात सतत पडणारा दुष्काळ व त्यातुन राज्याच्या तिजोरीवर वाढत चाललेला भार लक्षात घेता पाण्याच्या पुरातन जलश्रोतांचे प्लॅस्टीक पेपर अस्तरीकरण व विशेष दुरुस्तीच्या माध्यमातुन पुनर्जीवन होणे अत्यंत गरजेचे आहे यासंदर्भात शासणासोबत दि.२०डिसेंबर २०२० पासुन पत्राद्वारे करत असलेल्या पाठपुराव्याला दि.१७फेब्रुवारी २०२१च्या "मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या"अनुषंगाने मोठे यश प्राप्त होत आहे तरी याबाबत महाराष्ट्र शासणाचे खुप खुप आभार मानत आहोत.या योजने अंतर्गत शासणाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली ७,९१६ जलश्रोतांची विशेष दुरुस्ती करुन सिंचन क्षमता पुनर्स्थापीत करण्यात येणार आहे यामध्ये पाण्याची गळती होणारे लघुसिंचन तलाव,गाव तलाव,पाझर तलाव,माती नालाबांध,सिमेंट नालाबांध,साठवण बंधारे,कोल्हापुरी बंधारे,वळवणीचे बंधारे इ.प्रकल्पांचा सामावेश असुन संबंधित कामे ही शाखा अभियंता,कंत्राटदार व प्रशिक्षीत कर्मर्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाच्या प्रत्येक टप्याच्या व्हीडीओ चित्रिकरणामध्ये करणे अनिवार्य असेल तसेच केलेल्या कामांचा तपशिल ग्रामसभेसमोर ठेवणे देखील बंधनकारक राहील.या योजनेच्या यशस्वी अमलबजावणीने राज्यातील ७,९१६ जलश्रोत पूर्ण कार्यक्षमतेने वापरात येतील व राज्यावर परत दुष्काळाचे अनिष्ठ ओढावणार नाही अशी अपेक्षा असुन यासाठी महाराष्ट्रातील गावागावातील नागरीकांनी आपापल्या भागातील जलश्रोतोंचा आढावा घेवुन मृद व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करावा असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरातन जलश्रोतांच्या पुनर्जीवनाच्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला "मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या रुपाने मोठे यश प्राप्त होत असुन भविष्यात पुर्ण क्षमतेने जलश्रोतांचा वापर होवुन महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याच स्वप्न यातुन पूर्ण होणार आहे~शरद पवळे

0 Comments