हातातोंडाशी आलेलं पिक पुन्हा पावसाने झोडपल.
टाकळी ढोकेश्वर किरण थोरात
संपूर्ण महाराष्ट्रात काल झालेल्या वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा झोडपून काढलं. त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यातील सर्वच परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामध्ये ढवळपुरी येथील शेतकऱ्यांचे ऊस, बाजरी, टोमॅटो, चारा पीक, मका या पिकांसह डाळिंब , फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं. या जोरदार पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. जे पिकलं होतं, त्याची पुन्हा एकदा माती झाली. हातातोंडाशी आलेलं पिक पावसाने झोडपून काढलं. अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा नगर राहुरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसला.ऊस जमिनीवर आडवा झाला. टोमॅटो मातीमोल झाला. डाळिंब बागायतदारांवर मोठे संकट उभे राहिले . अवघ्या काही दिवसांत या पिकांची तोडणी होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणार होते. पण या पावसाने सारं काही उध्वस्त झालंय. याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ढवळपुरी येथील प्रगतशील शेतकरी संदीप वाघ व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार निलेश जी लंके साहेब यांच्याकडे धाव घेतली,आ. लंके यांनी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पारनेर तालुक्याची कृषी अधिकारी यांच्याकडे देखील मागणी केली आहे

0 Comments