जी. एस.महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै. सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके साहेबांनी आणि सहकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमाने बँकेची स्थापना केली आणि बँक वाढण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले, आणि जीएस महानगर बँकेला राज्यातील सर्व श्रेष्ठ सहकारी बँक म्हणून नावारूपास आणले. येत्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रावर दोन मोठी संकटे आली अशा परिस्थितीत जी.एस महानगर बँकेचे अध्यक्ष ॲड. उदयदादा शेळके साहेब आणि त्यांचे संचालक मंडळांनी बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रात २०१९ मध्ये कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी जेव्हा मोठ्या प्रमाणावर पुर आले होते त्यावळेस पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बँकेच्या वतीने 11 लाखांची मदत केली तसेच 2020 मध्ये संपूर्ण देशावरती कोरोनाचे संकट आले त्यामध्ये महाराष्ट्राला या संकटाशी सामोरे जाण्यासाठी जी.एस महानगर बँकेच्या वतीने 35 लाखांची मोलाची मदत केली गेली, त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन गावातील भारत देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान शहीद मेजर कदम यांच्या कुटुंबांच्या संकटाच्या काळात १ लाख रुपयांची मदत अध्यक्ष ॲड.उदायदादा शेळके साहेब आणि बँकेचे संचालक मंडळ यांनी केली याचा खरच आम्हा सभासदांना अभिमान वाटतोय.
लेखक.. गुलशन मिर्झा,नाशिक( सभासद जी. एस.महानगर बँक)

0 Comments