आईच्या स्मरणार्थ मोमीन बंधूंची पिंपरी जलसेन शाळेस २० हजारांची देणगी

पारनेर
        शैक्षणिक वारसा व शिक्षणाचे महत्व जाणून असलेल्या पिंपरी जलसेन ता. पारनेर येथील कुटुंबातील तीन बंधुंनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला २० हजार रुपयांची देणगी दिली.चाँदबी मजीद मोमीन यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या आईच्या स्मरणार्थ ज्ञान मंदिरासाठी मदत करावी असा त्यांच्या मुलांचा मानस होता.

  
     पिंपरी जलसेन गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जिल्ह्याच्या शैक्षणीक क्षेत्रात होत असलेली प्रगती या बंधुंना माहित होती. या शाळेच्या गुणवत्तेचा चढता आलेख, प्रत्येक वर्षी इस्त्रो शैक्षणिक सहलीसाठी होत असलेली शाळेतील विद्यार्थ्यांची निवड, शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत दरवर्षी होत असलेली विद्यार्थ्यांची वाढ, शाळेची गुणवत्ता पाहून आसपासच्या ७ ते ८ गावातील पालकांचा शाळेकडे वाढत असलेला ओढा या सर्व बाबींचा विचार करून या बंधूंनी या शाळेच्या भौतिक विकासासाठी देणगी देण्याचा निर्णय घेतला.
          निवृत्त कृषी सहाय्यक- हमजेखाँ मजीद मोमीन, जी.एस.महानगर बँकेचे अधिकारी-इम्तियाज मजीद मोमीन आणि पोष्टमन म्हणून कार्यरत असणारे-अन्वर मजीद मोमीन या३ बंधूंनी आपल्या गावच्या शाळेला आईच्या स्मरणार्थ २० हजार रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या निर्णयाचे  गावपातळीवर स्वागत होत आहे.
      देणगीचा स्वीकार करताना यावेळी गावचे उपसरपंच संदिप काळे,राजेंद्र थोरात, शाळेचे शिक्षक मल्हारी रेपाळे,सतीश भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments