रस्ता दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक
पारनेर :किरण थोरात
राज्य शासन कितीही ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ होणार असे सांगत असले तरी नगर जिल्ह्यात मात्र तशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. खड्ड्यांत रस्ते की रस्त्यात खड्डा हेच लक्षात येत नाही. याचा परिणाम अपघात होण्यावर होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते वाट पाहा, अशी भूमिका घेताना दिसून येत आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे. याचा परिणाम पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरून दिसून येत आहे रस्त्यांची पूर्णपणे चाळणी झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे वाचवुन रस्त्याचे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातुन तालुक्याला जोडणारे रस्त्याची संपूर्ण बिकट परिस्थिती झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.नागरिकांना रस्त्यावरुन चालतांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक किरकोळ अपघात सुध्दा घडले आहेत . रस्त्याची डागडुजी होत नसल्याने नागरिकांना नाहकच त्रास सोसावा लागत आहे.
पारनेर - जुन्नर सीमेवरील असलेले कळस या गावाला तालुक्याला कोणत्याही कामासाठी जायचं तर पाडळी या गावावरून जावं लागतं, कळस गावासाठी महत्वाची आणि जवळची बाजार पेठ म्हंटले तर अळकुटी शिवाय पर्याय नाही, शेती संदर्भात कुठलीही अडचण असेल, प्रशासकीय अडचण असेल तर आळकुटी किंवा पारनेर शिवाय पर्याय नाही.
परंतु गेल्या तीन वर्षांपासून या गावाचा वाहतुकीचा, दळण वळण चा प्रमुख रस्ता च खड्यात गेला आहे, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही, गेल्या तीन वर्षांपासून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले, खूप पुढाऱ्यांनी आश्वासने दिली, प्रशासकीय यंत्रणा जागी करण्याचा प्रयत्न केला, निवेदन देवून झाली, पण प्रश्न काही सुटला नाही, या रस्त्यावर खूप प्रमाणावर वाहतूक सुरू आहे, कांदा हे प्रमुख पीक असून त्याची वाहतूक याच रस्त्याने होत असते,अतिशय दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्याच काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे, अन्यथा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला जाईल , असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ गाडगे, कळस शाखाध्यक्ष योगेश पायमोडे, उपाध्यक्ष शुभम येवले, सचिव विजय काने, सल्लागार अंकुश काने, राहुल गाडगे, ऋषी गाडगे, कृष्णा गाडगे, तेजस गाडगे, यांनी दिला आहे, या पुढील आंदोलन हे मनसे स्टाइल ने केले जाईल असा इशारा महेंद्र गाडगे यांनी दिला आहे.
![]() |
| पारनेर तालुक्यातील कळस-पाडळी रस्त्याची दुरवस्था झालेली असून दुरुस्तीची मागणी मनसे कडून करण्यात येत आहे.छाया - किरण थोरात. |

0 Comments