कोरोना महामारी संदर्भात कु.शर्मिला येवले यांचा विशेष लेख
कोरोना महामारीत सर्व लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले,महामारीने सर्वांना कसं जगायचं ते शिकवलं अगदी सर्व सामान्य माणसांपासून ते उद्योगपतीपर्यँत असणाऱ्या वर्गाला एक चांगलीच शिकवण मिळाली,जर देशात यातच अजून कुठली आणखी महामारी वाढली असती तर लोकांनी काय खाल्लं असत असा मनात डोकावतो.आता जर विचार केला तर अनेक प्रश्न एक शेतकऱ्यांची मुलगी म्हणून माझ्या समोर उभे राहतात,या कोरोनामध्ये ना कोणाचा पैसा उपयोगी आला ना कोणाची खुर्ची इथं उपयोगी आला तो आमचा शेतकरी बाप जो बारा ही महिने शेतात राबतो,पिकवतो आणि त्यांनी जर पिकवलच नसत तर या कोरोना महामारीत लोकांनी काय खाल्लं असत.या लाॅकडाऊन काळात माझ्या मनात अनेक विचार,प्रश्न शेतात काम करत असताना येत होते.लॉकडाऊन असल्याने मी ही बाहेर गावाहून आल्यामुळे घरी गेले ते घरीच अडकून पडली म्हणजे ते असच झालं की पुणे सोडल्यासारखं होत आणि मी गावी होते,गावाकडे कोरोना काय हे तोपर्यंत माहिती ही नव्हतं गावकडे सगळं सुरळीत रोजच्या प्रमाणे सुरू होत.टीव्ही,मोबाईल व पेपरमधील बातम्या वाचत होते.गावगाड्यात शेतक-याकडे वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा प्रत्येक बळीराज्याच्या घरात होता हे समजत होत पण वळत नव्हतं कारण शहरातील परिस्थिती बिघडत होती लोकांकडे पुरेसा धान्यसाठा नव्हता,मग माझ्या मनात विचार आला.जर शेतकरी नसता तर शहरातील या लोकांनी काय केलं असत.100 ते 1000 रुपये ccd,बर्गर,पिझ्झा मध्ये घालणारे लोक आता काय खात असतील कारण आता तर हे सगळं बंद आहे.मग,आता तरी त्यांना शेतक-याची, त्यांच्या मालाची,त्याच्या कष्टांची किंमत समजली असेल का जर समजली असले तर ते आता तरी आरडाओरडा करायचं थांबवतील का ? साधी भाजी घ्याची असली तरी भाव कमी करून घेणारे शहरातील लोक त्यांना आता खरी शेतक-यांची किंमत
लाॅकडाऊनमध्ये समजली असेल मात्र शहरात फक्त शेतकऱ्यांना माल आणण्याची परवानगी होती तेव्हा शेतक-यांनी कोणता ही विचार न करता माल शहरात आणला.शहरात कोणालाही लाॅकडाऊन काळात भाजीपाला मिळाला नाही अस झालं नाही मात्र ही परिस्थिती शहरात होती त्याची दुसरी बाजू मोठ्या कष्टाने अनेक स्वप्न डोळ्यात ठेऊन शेतकरी आपला माल पिकवत होता पण विकणार कुठं असा प्रश्न त्याला पडला होता. लॉकडाऊन असल्याने बाजर समित्या बंद होत्या शेतात उभा असलेला माल जाग्यावर पडून राहिला तर खराब होणार म्हणून आहे ते पीक अनेक शेतक-यांनी आपल्या जनावरांना चारलं,पीक आहे तर भाव नाही अस्मानी सुलतानी संकटांना नेहमी तोंड देणारा आमचा शेतकरी बाप आत्मनिर्भर कधी बनणारच नाही का ? त्याला पिकवता येत पण विकता येत नाही आणि विकल तर त्याचा भाव त्याला ठरवण्याचा अधिकार नाही अस का ? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे जर त्याला आज संकटाला तोंड द्यावं लागतं. मागच्या वर्षी पूर,आता कोरोना त्यात चक्रीवादर परत आता पुन्हा पूर परिस्तिथी दिसत आहे.अनेक शहरातील तरुणांचे रोजगार कोरोना मध्ये गेले आहेत.त्या तरूणांसमोर अनेक संकट उभे राहिले आहेत मात्र शेतीकडे जायला कोणी तयार नाहीत.रोजगार शेतीतून उभा केला जाऊ शकतो,अस मला वाटत. मार्केटिंग जर शेती मालाची झाली तर सर्व सोपं होऊ शकेल घेणा-याला कमी भावात मिळेल ,विकणा-यांना चांगला दर मिळेल आणि त्यातून तरुण वर्गाना रोजगार मिळेल अस मला वाटत.अनेक मुलींना शेतकरी नवरा नको आहे अस मुली बोलतात ही खरी खंत माझ्यासारख्या तरुणीला वाटते....

लेखन-: कु.शर्मिला सुभाषराव येवले.
रा.इंदुरी, तालुका-:अकोले,जिल्हा-:अहमदनगर.

0 Comments