सरपंच ठकाराम लंके यांच्या सहकारी मित्रांचे "लेकिचे झाड" हा स्तुत्य उपक्रम ही काळाजी गरज; माजी आमदार सुरेशभाऊ गोरे


निघोज/ प्रतिनिधी:

सरपंच ठकाराम लंके व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचा "लेकिचे झाड" हा स्तुत्य उपक्रम असुन मानवाला रोजच नव्या रोगराई,महामारी मुळे नवनविन आजारांना सामोरे जावे लागत आहे,म्हणून भविष्यांत येणाऱ्या काळात पर्यावरणांचे सर्वंधन व जतन करायचे असेल तर वृक्षारोफन करण्यांशिवाय पर्याय नाही,मनुष्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाला सर्वाधिक महत्त्व असुन वृक्षारोफन करणे ही काळाजी गरज असल्यांचे प्रतिपादन खेड येथिल शिवसेनेचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे केले.
निघोज(ता.पारनेर)येथे नवविवाहीत वधू, वराच्या उपस्थितत पाहुण्यांना वृक्षाची भेट देतांना शिवसेनेचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे,कार्यसम्राट सरपंच ठकाराम लंके,व वृक्षसर्वंधन चळवळीचे प्रणेते वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ.


    गुरुवार (दि.१३)रोजी निघोज(शिववाडी)ता.पारनेर येथे रसाळ आणि मेहेर परिवाराच्या शुभमंगल प्रसंगी रसाळ परिवाराने आपल्या लाडक्या लेकीची आठवण संकल्प म्हणून एक झाड लावून आपल्या गावांमध्ये ही नवीन प्रथा चालू करायची,आणि तो संकल्प रसाळ परीवाराने विवाह सोहळा पार पडल्या नंतर लगेच आंब्याचे झाड नव विवाहीत वधू,वराच्या हस्ते रसाळ वधूच्या घरासमोर लावण्यांत आले.
      यावेळी वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ बोलतांना म्हणांले आपल्या भारतिय संस्कृतीची परपंरा महान असुन वृक्षरोफणांमुळे त्या झाडाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या कन्येची आठवण त्या परिवाराला कायमस्वरूपी राहील,तसेच निसर्गाचा देखील समतोल राखण्यास थोडीशी फार मदत होईल.
         या स्तुत्य उपक्रमाचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनीही कौतुक करुन अभिनंदन केले,अशा चांगल्या कामासाठी माझे कायम प्रोत्साहन राहील अशी ग्वाही दिली.यावेळी निघोज गावचे कार्यसम्राट सरपंच ठकाराम लंके यांनीही या उपक्रमास शुभेच्छा देऊन संपूर्ण गावामध्ये ही परंपरा आज पासून चालू होईल व या उपक्रमांची सुरुवात प्रत्येक शुभविवाह प्रसंगी एक झाड लावून निश्चितच केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी सर्व वऱ्हाडी मंडळीनां उपस्थित मान्यवरांना एक चांगल्या प्रतीचं झाड भेट म्हणून देण्यांत आले.
           खेड तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे,कार्यसम्राट सरपंच ठकाराम लंके,अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते,पद्मभूषण आदरणीय डॉ. आण्णासाहेब हजारे यांचे पीए शाम पठाडे,संदीप पठारे,चाकणचे प्रसिद्ध उद्योजक उमेशशेठ गोरे,उद्योजक दत्ताशेठ गवते,युवा नेते धीरजशेठ केळकर,मा.सरपंच सोपानशेठ भाकरे,आदर्श शिक्षक गंगाधर मेहेर गुरुजी,अर्जुन शिंदे,संतोष शिंदे,माजी सरपंच चंदुशेठ लामखडे,माजी चेअरमण अकुंश लोखंडे,प्रगतशिल युवा शेतकरी राहुल रसाळ,रांजेद्र रसाळ(आण्णा),निघोज परीसर भाजीपाला संस्थेचे सचिव रविंन्द्र रसाळ,सामाजिक कार्यकर्ते अनिल रसाळ,जालिंदरशेठ गागरे,जवळ्यांचे सरपंच किसनराव रासकर,बाबाजी रासकर,रमेश रासकर,अमोल ढाकणे,मेजर भुजबळ,हनुमंत गाडीलकर तसेच नगर,पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी पर्यावरण व वृक्षसर्वंधन चळवळीचे प्रणेते वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


आपल्या लाडक्या मुला,मुलीच्या विवाह सोहळ्यात लाखो रुपायांची उधळपट्टी,अनाठायी अवाढव्य खर्च करण्यांपेक्षा विवाह सोहळ्यांत वृक्षवाटप,व वृक्ष सर्वंधनाचे महत्व सांगा तेच खऱ्या अर्थांने नवविवाहीतांना लाख मोलाचे खरे शुभआर्शिवाद ठरतील.
---(ठकाराम लंके.सरपंच)

Post a Comment

0 Comments