प्रशासक निवडीच्या अर्धवट निर्णयाने राज्यात आराजकता ~शरद पवळे

रोख ठोक ठोक न्युज


महाराष्ट्र शासनाने कार्यकाळ संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रशासक नेमताना याला राजकीय वळण लागून मोठा घोडेबाजार होणार आहे. त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसणार असून प्रशासक निवडीच्या अर्धवट निर्णयाने राज्यात आराजकता माजेल असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
संपुर्ण राज्यात बहुतांश ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपुष्टात आला असुन कोरोना संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावाने सरपंच,उपसरपंच,सदस्यांच्या जागी प्रशासकाची निवड करण्याचा निर्णय सरकारने हाती घेतला असुन संपुर्ण गावचा कारभार प्रशासकाच्या हातात जाणार असुन ग्रामविकास,ग्रामसमस्या निवारणाबरोबर प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत होणार्‍या कामकाजाची जबाबदारी प्रशासकाच्या हातात जाणार असुन प्रशासक हा ग्रामपंचायतप्रमाणे ग्रामविकासाला जबाबदार रहाणार आहे याचा सरकारने गांभिर्याने विचार करत प्रशासक पदाची निवड प्रक्रियेचा अर्धवट निर्णय जनतेसह प्रशासणाला संभ्रमित करणारा असुन राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे आमदार असल्यामुळे पक्षहित समोर ठेवत स्वपक्षीयांची वर्णी लावणारा मोठा घोडेबाजार या निर्णयामुळे होणार आहे त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पुढार्‍यांनी राजकीय हेतुने,वयक्तीक वैमन्यस्येचे असलेले वातावरण आगित तेल टाकणारे आहे त्यामुळे पुढार्‍यांच्या  द्वेषाला बळी ठरणार्‍या कार्यकर्त्यांनी गावात गटतट निर्माण करुन गावाची शांतता भंग केली आहे त्यामुळे गावाच गावपण नष्ट झाले आहे त्याचबरोबर सरकारचा प्रशासक निवडीचा अर्धवट निर्णय जनतेत संभ्रम करणारा निर्णय तात्काळ मागे घेवुन त्यात ग्रामहीतासाठी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा हा प्रशासक निवडीचा निर्णय लागु केल्यास राज्यात आराजकता निर्माण होईल याचा शासणाने गांभिर्याने विचार हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले.

पक्षविरहीतग्रामपरिवर्तनासाठी,ग्रामविकासासाठी,एकात्मतेसाठी समाजाची निस्वार्थ सेवा करणार्‍या चारित्र्यशिल कार्यकर्त्यांना पक्षीय धोरणांमुळे लोकशाहीच्या पवित्र मंदिरापासुन दुर ठेवणारे निर्णय ग्रामहीतासाठी अत्यंत धोकादायक असुन समाजहीतासाठी जनतेने जागरुक होवुन पक्षीय भुमिकांना दुर ठेवत आदर्श गावची संकल्पना समोर ठेवुन लोकसभाग व श्रमदानावर विश्वास ठेवत ग्रामहीताची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती जाणार्‍या निर्णयांच्याच समर्थनार्थ उभे रहावे.
शरद पवळे (सामाजिक कार्यकर्ते)

Post a Comment

0 Comments