रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते विश्वासाचे! कोरोनावर मात केलेल्या ११वर्षीय मुलाच्या आईची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
निघोज
सध्या कोरोना पॉझिटीव्ह म्हटले की अनेक लोक जवळ न थांबता निघुन जातात परंतु, पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील थेट कोरोनाग्रस्त थेट कुटुंबियांना भेटून वनकुटा गावचे सरपंच अॅड.राहुल बबनराव झावरे यांनी आपल्या वर्गमैत्रिणीच्या विनंतीवरून तिच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे.
माझी व बहिणीची मुले, बहिण व भाऊ मुंबईवरून भाळवणीत आले. दोन दिवसानंतर मुंबईत सासूबाईंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे या वर्गमैत्रिणीने सोशलमीडियावर याबाबत सरपंच झावरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना व आपबिती व्यक्त केली आहे.
मी मुंबईत क्वॉरंटाईन झाले, गावी आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर माझ्या ११ वर्षाच्या लहानग्यालाही कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला. मी मुंबईत क्वॉरंटाईन, सासू हॉस्पिटलमध्ये व ११ वर्षांचा मुलगा नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल अशा विचित्र अवस्थेत वर्गमित्र अॅड. झावरे यांनी आ.निलेश लंके यांच्या मदतीने माझ्या कुटूंबाला सर्वतोपरी मदत करत रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक विश्वासाचे असतेे हे कृतीतून सिद्ध केल्याची भावनिक पोस्ट जयश्री पट्टेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. जावयामुळे भाळवणीमध्ये कोरोना आल्याची चर्चा सुरू झाली आणि माझ्या आईच्या घराजवळ फिरकायला कोणीही मागेना.
अशा स्थितीमध्ये वर्गमित्र राहुल झावरे यांच्याशी संपर्क केला आणि आमच्या सर्व समस्या आपोआप दुर होऊ लागल्या. मी मुंबईत, मुलगा एकटाच बुथ हॉस्पिटलमध्ये होता. अॅड. झावरे यांनी आ.लंके, तहसिलदार देवरे यांच्याशी चर्चा केली. मुलावर योग्य उपचार होतात किंवा नाही यासाठी नगरच्या वैद्यकिय अधिकार्यांशी संपर्क साधला गेला. त्यानंतर मात्र सोशल मीडियावरील आक्षेपार्ह चर्चा थांबली. खरे तर आईचे दोन्ही जावई मुंबईतच होते. असे असतानाही जावयाने गावात कोरोना आणल्याच्या, विनापरवानगी तालुक्यात आल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. अॅड. झावरे यांनी प्रशासनास योग्य माहिती दिल्यानंतर मात्र आमच्या कुटूंबाला मोठा दिलासा मिळाला.
१४ दिवस बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याला बुथ हॉस्पिटलधून घरी सोडण्यात आले. त्यावेळीही अॅड. झावरे यांनी त्याच वेळी पत्रकार विजय वाघमारे यांच्यासह घरी जात मुलाची आस्थेने चौकशी केली. आ.लंके यांच्याशी फोनवर संभाषण करून देत मुलास धिर दिला. कॉलेजमधील मित्र मैत्रिणी नंदा, शबाना, सुवर्णा, स्मिता, अभय भिसे, इंद्रजित, गिताराम या मित्रांनीही अतिशय खडतर काळात मोठा मानसिक आधार दिला. स्मिताने दवाखान्यात स्वत:च्या मुलाप्रमाणे माझ्या मुलाची काळजी घेतल्याचेही जयश्री यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

आमदार लंके यांची भावनिक साद;भाच्यासाठी काय खाऊ देवू--मुलगा नगरच्या दवाखान्यात, सासू मुंबईच्या दवाखान्यात, मी घरी क्वॉरंटाईन अशा संकटाच्या काळात आमदार लंके यांनी गावाकडची काही काळजी करू नका.माझ्या भाच्यासाठी काय खाऊ घेवून जावू असा अशी विचारणा फोन करून केली. मुलास काजू कतली आवडते हे समजल्यानंतर त्यांनी मुलगा घरी परतल्यावर अॅड.झावरे यांच्यामार्फत त्यास आठवणीने काजू कतली पाठविली.संकट काळात इतकी आपुलकी, मदत आणि पाठींबा मिळविण्यासाठी मित्र परिवार चांगला असवा लागतो असेही पट्टेकर यांनी म्हटले आहे.

0 Comments