पारनेर
कर्जत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या मयत लाभार्थ्यांचे अनुदानचे पैसे अपहार करून हडप केले आहे. या प्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी चौकशी अहवाल दिला असून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सैनिक बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील मयत लाभार्थ्यांचे सण २०१२ पासून २०१९ पर्यंत बँक खात्यावरील पैसे परस्पर काढून मोठा अपहार सैनिक बँकेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने केला असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा विशेष लेखा परीक्षक आर एफ निकम यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय निधीचा गैरव्यवहार व अफरातफर झालेली असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याचे जिल्हा लेखापरीक्षक यांनी निरीक्षण नोंदविले आहे. कर्जत तालुक्यातीलगरीब जनतेची फसवणूक करून शासनाच्या लाभापासून वंचित ठेऊन त्या निधीचा अपहार बँकेच्या पदाधिकारी यांनी केला आहे. त्याअनुषंगाने मा जिल्हाधिकारी यांनी सैनिक बँकेच्या अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर तत्काळ गुन्हे नोंदवण्यात यावेत अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, उपजिल्हाध्यक्ष आकाश वाबळे, सचिव वैभव पाचारणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


0 Comments