धनगर समाज संघर्ष समिती युवक अध्यक्ष पारनेर तालुका पदी शरद शिंदे ची निवड
टाकळी ढोकेश्वर : किरण अनिल थोरात
पारनेर तालुक्यातील कासारे येथील युवा कार्यकर्ते शरद पांडुरंग शिंदे यांची धनगर समाज संघर्ष समिती युवक अध्यक्ष पारनेर तालुका पदी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष इंजि. डी. आर.शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते करण्यात आली. पारनेर तालुक्यात धनगर समाजातील युवकांचे मजबूत संघटन करुन समाजाचे शैक्षणिक, सामाजिक कार्य करावे अशी अपेक्षा शेंडगे यांनी यावेळी व्यक्त केली.
धनगर समाजाला न्याय मिळावे यासाठी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असून धनगर समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शरद शिंदे यांनी केले. धनगर समाज कित्येक वर्षांपासून धनगर आरक्षण लागू करावे म्हणून प्रयत्न करत आहे,यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली आहेत परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकलेला नाही यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे याबाबत चर्चा करून आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करून समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन शिंदे यांनी उपस्थित समाज बांधवाना दिले, पारनेर तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाच्या मागन्या लक्षात घेता समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी मी सदैव काम करत राहील व समाजातील युवकांचे मजबूत संघटन करुन समाजाचे शैक्षणिक, सामाजिक कार्य तसेच धनगर धनगर समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी होणारा अन्याय थांबवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहील असे आश्वासन दिले आहे.

0 Comments