बोदगेवाडी येथील आयटी इंजिनीअर्स चा अनोखा उपक्रम
रोख ठोक न्यूज :-
लॉक डाऊन मुळे गावाला आले. पुण्यावरून गावाला आले म्हणून कोरोना सुरक्षा समितीने १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना केल्या. दिवसभर विलगीकरण कक्षात राहून करायचे काय ? असा प्रश्न उभा राहिला. गप्प बसतील ते तरुण कसले, पुण्यावरून आलेल्या या आयटी इंजिनिअर्सने बोदगेवाडी (पठारवडी) प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये सासामाजिक अंतर ठेऊन स्वच्छता करून वृक्षारोपण केले. त्यांनी केलेल्या साफसफाई व वृक्षारोपण यामुळे शाळेचा परिसर फुलून दिसू लागला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून पुणे मुंबई मध्ये राहणारे सध्या आपल्या गावाकडे परतत आहेत. गावाकडे आल्यानंतर त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण केले जाते. असेच आपल्या मायभूमीतून पुणे येथे आयटी कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या बोदगेवाडी येथील इंजिनिअर तरुण लॉक डाऊन मुळे गावी आले होते. त्यांना कोरोना सुरक्षा समितीने 14 दिवस गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण केले. याच जिल्हापरिषद शाळेतून शिक्षण घेऊन आज नामांकित आयटी कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या या तरुणांनी लॉक डाऊन काळामध्ये शाळेसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतात. त्यामध्ये दोन महिन्यापासून शाळा बंद असल्याने तेथील परिसर अतिशय अस्वच्छ असल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सामाजिक अंतर ठेवून बोदगेवाडी जिल्हा परिषद शाळेचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. स्वच्छ केलेल्या परिसरामध्ये जर फुलझाडे लावली तर हा परिसर आणखी खुलून दिसेल ही कल्पना या तरुणांच्या मनात सुचल्यानंतर क्रांती युवा ग्रुप मार्फत झेंडूच्या फुलांची मागणी करण्यात आली. व सरकार ग्रुप तर्फे ट्रॅक्टर मार्फत ही झाडे लावण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छता करून झाडे लावल्यानंतर शाळेच्या परिसर अतिशय दैदिप्यमान दिसत होता. ज्या शाळेतून शिक्षण घेऊन आज आपण आयुष्यात एवढ्या उंचीवर येऊन पोहोचलो त्याच शाळेसाठी लॉक डाऊन निमित्ताने काहीतरी करण्यासाठी मिळाल्याचा आनंद या आयटी कंपनीतील इंजिनिअर च्या चेहऱ्यावर दिसत होता. शाळेच्या सुशोभिकरण बद्दल या शाळेचे मुख्याध्यापक रेपाळे सर व ग्रामस्थांनी या तरुणांना धन्यवाद देऊन शुभेच्छा दिल्या.
रोख ठोक न्यूज :-
![]() |
| बोदगेवाडी (पठारवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता करून वृक्षारोपण करताना विलगिकरण कक्षातील तरुण (फोटो - चंद्रकांत कदम) |

2 Comments
Very nice work.
ReplyDeleteVery nice work.
ReplyDelete