रोख ठोक न्यूज :-
लॉक डाऊन मुळे रोजगार नसलेल्या व उपासमार होत असलेल्या तालुक्यातील गरजू व्यक्तींना मोफत जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात येईल गरजूंनी माहिती देण्याचे आवाहन डॉ श्रीकांत पठारे यांनी केल्यानंतर गांजिभोयारे येथील उर्वरित कुटूबांना डॉ श्रीकांत पठारे मित्रपरिवारकडून मोफत जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आले.सामाजिक भावना जपत डॉ पठारे यांच्या मित्रपरिवारकडून आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अनेक गराजुंच्या चुली पेटवून त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. नुकतेच जवळा व सांगवी सूर्या येथील निवारा केंद्रांना भेटी देऊन तेथील परप्रांतीय मजुरांना जीवनावश्यक किराणा वाटप केला होता. पारनेर तालक्यातील एकही कुटुंब उपाशी राहू नये म्हणून हा उपक्रम सुरू केला असून ज्या भागात अद्यापही कुटुंबाची उपासमार होत असेल तेथील गरजूंना आवश्यक आसलेला किराणा पोहचवण्यात येईल. तेथील नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा, त्यांना मदत पोहोच केली जाईल असे आवाहन डॉ पठारे मित्रपरीवाराकडून पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी केले होते. त्यानुसार गांजीभोयरे येथील अनेक कुटुंबांना गरज असल्याचे निदर्शनास आले त्यानुसार उर्वरित गरजू कुटुबांना डॉ पठारे मित्रपरिवाराकडून त्या कुटुबंना मोफत जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आला.
- यावेळी डॉ श्रीकांत पठारे यांचे बंधू पप्पू नाना पठारे, प्रशांत निंबाळकर, गोविंद खणसे, अन्वर शेख, नमन शेख, सुलतान इनामदार, इत्यादी उपस्थित होते.

0 Comments