वेळ पडल्यास नियम आणखी कठोर करावी लागतील
सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे, भारत जगाची महासत्ता बनू शकते.
३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन कायम
नागरिकांनी आणखी काळजी घेण्याची गरज
रोख ठोक न्यूज चंद्रकांत कदम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 वाजता पत्रकार परिषदेतून जनतेला संबोधित केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषद मधील ठळक मुद्दे.
- प्रथमच एका विषाणूमुळे आम्हाला तोंडाला पट्टया लावून व्हिडिओ कॉन्फरन्स झाली.
- महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे येथे कोरोना बधितांची संख्या जास्त आहे.
- मुंबई मधील ज्या भागात रुग्ण सापडले तेथील भाग सील केले आहेत. त्या भागात अत्यावश्यक सेवा पुरवले जात आहेत. तेथील भागात संबधित महानगर पालिका चाचण्या करत आहेत. मुंबई मध्ये जवळपास १९ हजार चाचण्या पूर्ण त्यात १ हजार positive रुग्ण सापडले.
- सापडलेल्या सर्व रुग्णांची तपासणी सुरू आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या देखील जास्त आहेत.
- अत्यावश्यक सेवेशिवय घराबाहेर पडू नका. बाहेर पडायचे असल्यास मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. बाहेर पडणार असाल तर घरच्यांपासून विलागिकरण मध्ये रहा.
- जगभरातील संकटावर मात करण्यासाठी वेळ लागणार आहे.
- १४ तारखेनंतर ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन कायम ठेवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
- लॉक डाऊन काळात कृषीविषयक सर्व गोष्टी चालू राहणार.
- आपण जर शिस्त व्यवस्थित पाळून विषाणूची चैन तोडली तर आपली या विषणुंपासून मुक्ती मिळेल.
- देशातील सर्व मुख्यमंत्री राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आहेत. सर्व जण पंतप्रधान यांच्यासोबत व पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आहे.
- आपला देश जगाची महासत्ता नक्कीच बनणार आहे.
- ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी work from home.करा
- वेळ पडल्यास नियम आणखी कठोर करावे लागतील. खबरदारी घ्या.
- तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो. आपण जिंकणारच असे दिलासादायक आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला पत्रकार परिषदेतून केले.

0 Comments