रेड झोन मधील जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन वाढणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

रोख ठोक न्यूज


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच जनतेला संबोधित केले यावेळी ते म्हणाले की, "रेड झोन मधील जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी काळजी घेतली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. व खबरदारी म्हणून रेड झोन परिसरामध्ये लॉक डाऊन वाढवावा लागेल असे मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणखी काय म्हणाले ते पहा खाली.

  • कोरोना हा जागतिक युद्धासारखे सारखे संकट असून हा अदृश्य स्वरुवापचा शत्रू आहे. लोकांनी संयम ठेवायला पाहिजे.
  • संसर्ग वाढू न देण्यासाठी लॉक डाऊन पाळणे गरजेचे. आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे. WHO  सूचनांचे पालन करावे.
  • कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. केंद्राकडून मदतची अपेक्षा आहे. प्रथम कोरोनाचे संकट घालवण्यासाठी प्राधान्य देत आहे.
  • नागरिकांनी संयम पाळायला पाहिजे. गर्दी करू नये. भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करू नये. 
  • ज्या शहरी भागात गंभीर परिस्थिती आहे तिथे लॉक डाऊन वाढवण्यासाठी विचार करावे लागेल. नागरिकांना नागरी सुविधा पुरविली जाईल.
  • रेड झोन परिसरात काळजी घेणे गरजेचे. महानगर पालिकेने सतर्क राहणे गरजेचे. सर्वांनी सतर्क राहावे. सरकार काळजी घेणार.
  • डॉक्टरांसाठी ppeकिट चा वापर करणे गरजेचे. किट चा वापर करून डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करावे.
  • कोरोना बाबत सरकार, मा. मुख्यमंत्री व आम्ही सर्व जनतेसाठी काम करत आहोत. सर्व प्रशासन आयुक्त, जिल्हाधिकारी, महसूल कर्मचारी, पोलीस सर्व प्रशासन सर्व जबाबदारीने काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments