काळजी घ्या! देशात करोनाचे २९०२ रुग्ण, मृतांची संख्या ६८ वर पोहोचली

रोख ठोक न्यूज


देशातील करोनाबाधितांची संख्या २९०२ वर पोहोचली असून ६८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. करोनासंबंधी सध्या देशात काय परिस्थिती आहे याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. “सध्या देशात एकूण २९०२ करोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात करोनाचे ६०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत मृतांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. दरम्यान १८३ जणांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,” अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी यावेळी दिली.

करोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९ टक्के रुग्ण ० ते २० वयोगटातील आहेत. तर ४२ टक्के रुग्ण २१ ते ४० वयोगटातील आहेत. ४१ ते ६० वयोगटातील रुग्णांची संख्या ३३ टक्के असून ६० च्या पुढील रुग्णांची संख्या १७ टक्के असल्याचं लव अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं.

Post a Comment

0 Comments