अहमदनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे व मास्क न लावणाऱ्या ७०० जणांवर कारवाई

रोख ठोक न्यूज:-
 अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या अशा ७०० हून अधिक व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ३ लाख ६० हजार ७५० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments