पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा प्रवरानदी मध्ये बुडून मृत्यू.

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील घटना

रोख ठोक न्यूज :- 

दुपारी भर उन्हात प्रवरानदी मध्ये पोहण्यासाठी गेलेले तिघांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परसिरात एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील व अश्वि पोलीस स्टेशनसाच्या हद्दीत असणाऱ्या दाढ खुर्द येथील
शरद भागाजी पर्वत  .वय वर्ष २४ असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
    सदर घटनेची माहिती  समाजीक कार्यकर्ते सुनिल जोशी ,कीशोर जोशी यांना मिळताच घटनास्थळी धाव घेत अश्वी पोलीस स्टेशन ला सदर घटनेची माहिती कळविण्यात आली तदनंतर दखल घेत अश्वी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मांडवकर व टीम घटनास्थळी येवूनमृतदेह बाहेर काढण्यासाठी आश्वी पोलिस स्टेशन चे पो.कॉ.संतोष शिंदे ,पो.कॉ.शिवाजी नर्हे,व गावातील संदिप बोरसे,गोट्या पर्वत ,दत्तु मेंगाळ,कार्तिक  कहार यांनी पाण्यातून  बाहेर काढले.
व घटनास्थळी पंचनामा करण्यात अालाय पोलिस निरिक्षक मांडवकर,पो.कॉ.मोरे,ग्रामसेवक सौ.वाळे मँडम,तलाठी सौ. सांगळे मँडम, सरपंच सौ.जोशी आकस्मात मुत्य, रजी ,नंबर, १८/२०२०सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद अश्वी पोलिस स्टेशन ला करण्यात आली आहे.
   पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक आर,टी ,मोरे करत आहे हा युवक प्रवरा हॉस्पिटलमध्ये  जी.एन.एम कोर्स पुर्ण झालेला  आहे .घरची परिस्थिती नाजूक असून तरी पश्चात आई,दोन भाऊ, असा परिवार आहे . सदर घटनेने परिसरत हळहळ व्यक्त होत आहे..

Post a Comment

0 Comments