कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी पारनेर तहसीलवर शिवसेनेचा भव्य मोर्चा

 शिवसेना उबाठा वतीने कांदाप्रश्नी पारनेर तहसीलवर आंदोलन

पारनेर - चंद्रकांत कदम

राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेत असले तरी मागील काही काळापासून कांद्याचा बाजारभाव अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयावर शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.

पारनेर तहसील कार्यालयावर कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत आण्णा पठारे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले. फोटो - चंद्रकांत कदम


हा मोर्चा पारनेर तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत आण्णा पठारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्च्यानंतर सन्माननीय तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


यावेळी उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे, बाजार समितीचे उपसभापती किसनराव सुपेकर, जिल्हा समन्वयक सखाराम उजगरे, पारनेर नगर विधानसभाप्रमुख संतोष येवले,  युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत राजे निंबाळकर, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब नऱ्हे, माजी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, शेतकरी सेना तालुकाप्रमुख किसनराव चौधरी, उपतालुकाप्रमुख नितीन आहेर, तालुका समन्वयक मंगेश सालके, युवासेना तालुका संघटक आदिनाथ कदम, उपसरपंच विवेक मोरे,गटप्रमुख बाबासाहेब रेपाळे, निघोज गणप्रमुख संतोष साबळे, डॉ. राजेश येवले, शेतकरी सेना तालुका संघटक धनंजय पांढरे, शेतकरी सेना उपतालुकाप्रमुख सूर्यकांत सालके, निघोज गटप्रमुख हरिओम परंडवाल, सुभाषराव भोसले, शेतकरी सेना जवळा गणप्रमुख संपत चत्तर, राजेंद्र लालगे, ओंकार एरंडे, अंबादास कणसे, दत्तात्रय शिंदे, चेअरमन संतोष लामखडे, दादाभाऊ जाधव, अतुल मुळे, सोपान लंके, दत्ता पानसरे, शेतकरी सेना गणप्रमुख संपत खोडदे, प्रविण आवारी, राजेश पावडे, युवासेना गटप्रमुख राजेंद्र नवले, प्रवीण व्यवहारे, भरत ठुबे, अतुल पांढरे, ओंकार थोरात, ओंकार पांढरे, रोहन थोरात, युवासेना गणप्रमुख राजू बोरुडे, युवासेना गणप्रमुख संकेत शेळके, कामगारसेना सुपा गटप्रमुख शिवतेज शेळके, सोशल मिडिया गटप्रमुख नितेश धोत्रे, संतोष कापसे, सुनील आरोटे, दिपक मगर, युवासेना ढवळपुरी गटप्रमुख आदित्य महांडुळे, सोहम महांडुळे, राहुल खोडदे, सोशल मिडिया गटप्रमुख राहुल मोरे, शुभम पठारे, शिवसेना गणप्रमुख पप्पू गाडगे, शेतकरी सेना गटप्रमुख सुरेश बुचुडे, सोशल मिडिया गणप्रमुख बंडू मोरे, विरोली शाखाप्रमुख लहू बुचुडे, दिपक मावळे, खोसे टेलर (म्हस्केवाडी), पोपट वायकर, रोहन कदम, भास्कर नायकोडी, भाऊसाहेब गोरे, भावराव नायकोडी, विनायक बरशिले, अनिल पुंडे, भगवान डेरे, संदिप गोसावी, सुनील येवले  यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

▪ कांद्याला किमान हमीभाव जाहीर करावा

▪ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी

▪ बाजार समित्यांमध्ये योग्य दराने कांदा खरेदीची व्यवस्था करावी

▪ कांदा साठवणूक व निर्यात वाढवण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात



Post a Comment

0 Comments