विद्यानगर येथे माजी विद्यार्थी - शिक्षक स्नेहमेळा उत्साहात

सुदर्शन दरेकर - कुडाळ

    श्री. धुंदीबाबा विद्यालय, विद्यानगर ता.जावली येथे सन १९८७-८८ च्या इयत्ता १० वीच्या बॕचचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या बॕचचे एकूण..विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या गुरुंप्रति अपार आदर दर्शविणारा, त्यांनी दिलेले सुसंस्कार जपणारा हा विद्यार्थीवृंद  स्नेहमेळ्यात आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींमध्ये रंगून गेला. शाळा प्रवेशद्वाराजवळ आपल्या गुरुंचे आगमन होताच या विद्यार्थ्यांनी गुलाब पाकळ्यांची उधळण करत व नतमस्तक होत गुरुंचे स्वागत केले व वाजत-गाजत साग्रसंगिताच्या गोड आवाजात त्यांना सन्मानाने व्यासपिठावर आणले. व्यासपिठावर उपस्थित नियोजित अध्यक्ष मा.श्री.तानाजी जाधव मुख्याध्यापक धुंदीबाबा विद्यालय, विद्यानगर, प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य श्री. रामकृष्ण निकम सर,श्री. सुभाष शिंदे सर, श्री. दादासाहेब शेख सर, श्री. अनिल शेळके सर, श्री.सदाशिव स्वामी सर, श्री.सुर्यकांत शेवाळे सर, श्री.चंद्रकांत घाडगे सर, श्री.श्रीरंग वीरकर सर, श्री.नारायण पवार व श्रीमती खामकर शिपाई वर्ग आदी उपस्थित होते.


           सर्वांना दुःख सागरात सोडून गेलेल्या दिवागत गुरुजनांना व माजी विद्यार्थ्यांना सर्व प्रथम श्रद्धांजली अर्पित करुन संवेदनशीलतापूर्वक कार्यक्रमाची सुरुवात झाली.मान्यवरांच्या हस्ते  क्रांतिसूर्य जोतिबा फुले, क्रांतिज्योती साविञीबाई फुले,विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील, तपस्वी संत धुंदीबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन झाले व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री. धुंदीबाबा विद्यालयातील विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे व शाळेतील सर्व सध्या कार्यरत गुरुजनांचे शाल, श्रीफळ, बुके व स्मृतिचिन्ह देवून स्वागत तथा सन्मान करणेत आला.कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन करणेत विशेष पुढाकार घेतलेल्या श्री. विलास चव्हाण, श्री.दिलीप महामुलकर, श्री. रत्नाकर भिलारे यांचाही प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करणेत आला. विशेष बाब म्हणजे या बॕचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील तत्कालीन विद्यार्थीनींचा माहेरची साडी भेट देवून तीन दिवस आधीच महिला दिनाच्या शुभेच्छा देत अनोखा सन्मान केला.श्री. रत्नाकर भिलारे यांनी प्रास्तविक केले तद् नंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळखपरेड देत आपण सध्या काय करतो याबद्दल सांगितले.


           माजी विद्यार्थी मनोगतात दिलीप महामुलकर,आप्पासाहेब कांबळे, पांडुरंग शिंदे, कायदेतज्ञ श्री. जाधव व विलास चव्हाण यांनी आपले विचार मांडले. आर्थिक अडचणींमुळे शालेय शिक्षण घेवू न शकणा-या होतकरु विद्यार्थ्यांसाठी फंडिग करुन ठेव रकमेतील व्याजातून संबंधित मुलांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी या बॕचने घेवून एक नवा आदर्श पुढे ठेवला इतकेच नाही तर शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपणाला चालना, विद्यार्थी प्रेरणा असेही उपक्रम घेणार असल्याचे जाहीर केले.महिला विद्यार्थीनींनमार्फत फंडिंगसाठी प्राप्त झालेली काही रक्कम ही व्यासपिठावर श्री.चव्हाण यांनी स्विकारली.ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो. यासाठीचा हा छोटा प्रयत्न असे विचार मांडत विद्यार्थी मनोगते थांबली. उपस्थित गुरुजनांमध्ये श्री. शेख सर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.श्री.सुर्यकांत शेवाळे सरांनी आपल्या मातीशी एकरुप रहा. संस्कृती जपा. सर्वांना मदत करत रहा.खरे शिक्षण हेच असे म्हणत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री. रामकृष्ण निकम सर तत्कालीन इंग्रजी अध्यापक जनता माध्यमिक विद्यालय, विद्यानगर व संस्थापक अध्यक्ष ए.एस.पी.काॕनव्हेंट शाळा, मिलीटरी अपशिंगे सातारा या जुन्या आठवणींना उजाळा देत त्या काळची प्रतिकूल परिस्थिती व त्यातून आपण घेतलेले शिक्षण व ख-या अर्थाने रयत शिक्षण संस्थेचे साकार केलेले ब्रीदवाक्य याचे आम्हा सर्व गुरुवर्यांना कौतुक वाटते. समाजहिताचा विचार आपण पुढे मांडलात असे म्हणत शुभेच्छा व आशीर्वाद दिले. अध्यक्षीय भाषणात श्री. तानाजी जाधव यांनी आपण हाती घेतलेल्या उपक्रमात माझी नेहमीच साथ असेल.सर्व च माजी विद्यार्थ्यांनी एकवटून पंचक्रोशीतील मुलांना प्रेरणा देवू या. चांगले विचार पुढे आणू या. कर्मवीरांचे विचार जपूया,असे मोलाचे मार्गदर्शन केले. भिवडी मधील विलास चव्हाण,किरण जांभळे, विठ्ठल चव्हाण,रतन महामुलकर,सुरेश विधाते,उत्तम सुर्यवंशी, अंजना विधाते साधना जाधव हजर होते.

Post a Comment

0 Comments