शिरसुले - निघोज पुष्पावती नदीवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांची हाल‌अपेष्टा

 


        निघोज प्रतिनिधी दि.१४ फेब्रुवारी

शिरसुले - निघोज या परिसरातील पुष्पावती नदीवरील पूल वाहून गेल्याने निघोज व शिरसुले गावातील लोकांना हाल‌अपेष्टांना सामोरे जावे लागत असून लवकरात लवकर पन्नास लाख रुपये खर्चाच्या पुलाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी निघोज व शिरसुले ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की गेली पंधरा वर्षांपूर्वी या नदीवर शिरसुले व निघोज येथील जनतेला दळण वळण माध्यमातून पुल बांधण्यात आला होता. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने या पुलाच्या काही भागाला तडा गेला होता. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करुन माहिती दिली होती. मात्र दखल घेतली गेली नाही. नुकतेच कुकडी डावा कालव्याचे पाणी पुष्पावती नदीला सोडण्यात आले. या पाण्याच्या दाबाने हा पुल पुर्णपणे ढासळला आहे. सातत्याने शिरसुले व निघोज ग्रामस्थ या पुलाचा दळणवळणासाठी वापर करतात. सध्या पुल ढासळल्याने निघोज व शिरसुले परिसरातील लोकांचे येणेजाणे बंद झाले आहे. यामुळे विद्यार्थी,दूध‌उत्पादक शेतकरी यांना तसेच ग्रामस्थ यांच्या हाल‌अपेष्टांमध्ये वाढ झाली आहे. याचा विचार करुन खासदार डॉ सुजय विखे पाटील,तसेच आमदार नीलेश लंके यांनी तातडीने या पुलाची तरतूद करुण किमान पन्नास लाख रुपये निधीची तरतूद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments