Braking News.........
पिंपरी जलसेन शाळेत २ वेळा चोरीचा प्रयत्न
३ दिवसांत २ वेळा चोरीचा प्रयत्न
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३ दिवसांत चोरट्यांनी २ वेळा चोरीचा प्रयत्न केला परंतु चोरीचा प्रयत्न फसला. याबाबत पारनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे रविवारी (दि.१७) रात्री अज्ञात चोरट्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या कार्यालयाची खिडकी खोलून कार्यालयात अडकवून ठेवलेल्या इतर वर्गांच्या चाव्या काठीच्या साहाय्याने काढून घेतल्या. त्यानंतर चाव्यांच्या मदतीने शाळेचे वर्ग खोलण्याचा प्रयत्न केला. एक वर्ग खोली खोलल्यानंतर तेथे काही मिळून न आल्याने तेथे असलेले सॅनिटायझर चे ड्रम घेऊन चोरांनी पलायन केले. इतर खोल्यांचे कुलूप न खोलता आल्याने चोरटे पसार झाले. हा प्रकार सोमवारी(दि.१८) सकाळी शिक्षकांनी शाळा उघडल्यावर लक्षात आला. त्यानंतर पुन्हा मंगळवारी(दि.१९) रात्री पुन्हा त्याच कार्यालयाचे खिडकी खोलून चाव्या काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु शिक्षकांनी प्रसंगवधान राखत ठेवलेल्या चाव्यांची जागा बदलल्याने चोरट्यांच्या हाती त्या चाव्या लागल्या नाहीत. बुधवारी सकाळी ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आली. सदर चोरीबाबत शाळेचे मुख्याध्यापक रा.या. औटी यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विद्या मंदिरात चोरीसारखे प्रकार घडणे चुकीचे आहे. ३ दिवसांत चोरट्यांनी २ वेळा चोरीचा प्रयत्न करणे म्हणजे खूप मोठे धाडस केले आहे. यामुळे शाळेची सुरक्षितता धोक्यात आली असून पिंप्री जलसेन ग्रामस्थांनी व पारनेर पोलिसांनी याबाबत लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक रा. या औटी यांनी व्यक्त केले.
0 Comments