पारनेर- पिंप्री- वडनेर बससेवा पूर्ववत सुरू डॉ श्रीकांत पठारे यांच्या प्रयत्नांना यश

 




पारनेर- पिंप्री- वडनेर बससेवा पूर्ववत सुरू

डॉ श्रीकांत पठारे यांच्या प्रयत्नांना यश

पारनेर प्रतिनिधी

कोरोना काळात बससेवा बंद झाल्या होत्या. तेव्हापासून नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी एसटी बस नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आज सोमवार पासून पारनेर- पिंप्री- वडनेर बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली असल्याची माहिती पारनेर बस डेपो व्यवस्थापक पराग भोपळे यांनी दिली.


         सध्या विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने नागरिक देखील दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु एसटी बस बंद असल्याने दळनवळणाचा मोठया अडचणी निर्माण होत असल्याने पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत पारनेर बसस्थानक व्यवस्थापक पराग भोपळे यांची भेट घेतली. तालुक्यातून सर्वच गावांतून रोज विद्यार्थी पारनेर येथे शिक्षणासाठी येत असल्याने त्यांची गैरसोय टाळावी यासाठी तालुक्यातील सर्वच गावांतील एसटी बस सुरू करण्याची मागणी डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यवस्थापक पराग भोपळे यांच्याकडे ४-५ दिवसांपूर्वी केली होती. डॉ पठारेंच्या मागणीला एसटी महामंडळाकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील अनेक गावांतील एसटी बससुरु करण्यात आल्या आहेत. एसटी बससुरु झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पारनेर येथे येण्यासाठी निर्मान होणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. याबद्दल डॉ श्रीकांत पठारे यांचे तालुक्यातून आभार व्यक्त केले जात आहे.

एसटी बस सेवा बंद असल्याने नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे हाल होत होते. ही बससेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. त्या दृष्टीने बसस्थानक व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील बससेवा सुरू केली. नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न मिटला यात समाधान वाटते. यापुढील काळात जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रयत्नशील राहणार आहे. डॉ श्रीकांत पठारे पंचायत समिती सदस्य 




Post a Comment

0 Comments